![]() |
श्री.संत रोहिदास यांच्या प्रतिमेपूजन करताना मंगराया हक्के व अन्य मान्यवर |
*टाकळीवाडी मध्ये संत रोहिदास जयंती उत्साहात संपन्न*
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
टाकळीवाडी : शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी येथे श्री संत रोहिदास जयंती उत्साह संपन्न झाली. याप्रसंगी फोटो पूजन व पुष्पहार मंगराया हक्के यांच्या हस्ते घालण्यात आला.
याप्रसंगी मंगराया हक्के म्हणाले, संत रोहिदास यांना ईश्वरभक्तीची प्रचंड आवड होती. संत रोहिदास यांची भक्ती भावना पाहून स्वामी रामानंद यांनी त्यांना आपला शिष्य म्हणून स्वीकार केला. संत रोहिदास यांनी भजन, भक्तीगीते लिहिले. त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचे कार्य झाले. त्यांचे विचार व कृती आज प्रत्येक व्यक्तीने अवलंबली पाहिजे असे ते उद्गारले.श्री.संत रोहिदासांचे कार्य आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे.
यावेळी ग्रामपंचायत सरपंच मंगल बिरणगे ,सर्व सदस्य, महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष माजी सुभेदार केंदबा कांबळे, सचिन लोहार( फौजी), भरत खोत (फौजी), संजय बदामे (फौजी) बाळू बिरणगे, पिंटू चिगरे ,भरत निर्मळे, अनिल कांबळे ,आप्पासो निर्मळे, मोहन निर्मळे, संतोष निर्मळे ,अमोल निर्मळे,पत्रकार नामदेव निर्मळे तसेच सर्व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा