![]() |
मार्गदर्शन करताना डॉ.जे.एस.इंगळे व सुयेकचे अध्यक्ष डॉ. राहुल म्होपरे, अध्यक्षस्थानी डॉ.के. टी.जाधव व अन्य मान्यवर |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
विटा : "सत्य आणि अहिंसा च्या मार्गाने भारत देशाला मिळवून देणारे महात्मा गांधी यांनी खेड्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्न केले. त्यांनी खादीचा पुरस्कार केला. मोठ्या उद्योगापेक्षा छोटे ग्रामीण उद्योग चांगले. खेड्यांची प्रगती करण्यासाठी छोटे छोटे उद्योग सुरू केले पाहिजेत .उत्पादन ,वितरण उपयोग खेड्यातच झाले पाहिजेत. ग्रामीण आर्थिक व्यवहार सहकाराच्या तत्त्वावर बनले पाहिजेत. शहरे ही स्वतःची काळजी घेऊ शकतात .ग्रामीण भागाच्या विकासाचा विचार केला पाहिजे. स्वदेशी धर्माचे पालन करीत स्वदेशी वस्तूंची जास्तीत जास्त खरेदी करणे गरजेचे आहे. मोठमोठे यंत्रे वापरण्यापेक्षा लहान यंत्रांचा व श्रमिकांचा वापर करावा .प्रत्येक व्यक्तीला रोजगार मिळावा. अन्न वस्त्र निवारा या गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत. खेड्यातील प्रत्येक व्यक्तीला रोजगाराचा हक्क आहे .कोणतेही काम कमी दर्जाचे नाही. साठेबाजी करू नये ,तसेच जीवनावश्यक वस्तूवर ही कर बसू नये. स्वदेशी धर्माचे पालन केले पाहिजे.आपली वस्तू वापरली पाहिजे तरच नफा वाढेल.भविष्यात उद्योजक घडणे गरजेचे आहे. अशाप्रकारे आदर्श खेड्याची संकल्पना मांडली. महात्मा गांधीजींचे दहा महत्त्वाचे आर्थिक विचार त्याचबरोबर त्यांच्या सामाजिक व राजकीय विचार प्रा. डॉ. इंगळे जे. एस. यांनी व्यक्त केले."
जीवन प्रबोधनी कन्या महाविद्यालय, विटा, येथे अर्थशास्त्र व वाणिज्य विभाग आणि शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स असोसिएशन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित 19व्या व्याख्यानमालेत 'महात्मा गांधीजींचे आर्थिक विचार' या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यापुढे ते म्हणाले,खेड्यांची प्रगती होण्यासाठी लघुउद्योग हे निर्माण करायला हवेत. ग्रामीण आर्थिक व्यवहार सहकार तत्वावर चालले पाहिजेत. खेड्यात तयार होणारी खादी लोकांनी खरेदी करावी. आपल्याच खेड्यात तयार होणारी वस्तू वापरली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने महात्मा गांधीजींचे स्वप्न साकार होईल.
याप्रसंगी बोलताना प्रमुख उपस्थिती म्हणून शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स असोसिएशन कोल्हापूरचे अध्यक्ष मा. प्रा.डॉ. राहुल शंकर म्होपरे उपस्थित होते.यावेळी त्यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना उच्च शिक्षणासाठी प्रेरित केले. तसेच वेगवेगळ्या चर्चा सत्रामध्ये सहभाग घ्यावा व आपली शैक्षणिक पात्रता वाढवावी त्यासाठी कसोशीने प्रयत्न करा.जीवनात सतत प्रयत्न करत रहा अपयश आले म्हणून हार मानू नका अशा प्रकारचे मौलिक विचार त्यांनी याप्रसंगी मांडले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अर्थशास्त्र प्रमुख प्रा. यादव के .टी. हे होते. त्यांनी प्रमुख मार्गदर्शकांचा आढावा घेतला . महात्मा गांधीजींचे आर्थिक विचार संकल्पना स्पष्ट केली. महात्मा गांधीजींचे विचार आपल्या देशासाठी किती महत्वपूर्ण आहे हेही सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. लाटणे एन .एम. व स्वागत आत्तार एन .एम. यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार प्रा. डॉ. भिंगारदेवे एल. आर. यांनी केले. या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन प्रा. जाधव पी.पी. यांनी केले.
सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वर्ग, कर्मचारी वर्ग व सर्व विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या. सुयेक व महाविद्यालयाच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा