Breaking

सोमवार, १३ फेब्रुवारी, २०२३

प्रबोधिनीच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ.अशोक चौसाळकर तर उपाध्यक्षपदी प्रा. डॉ. भारती पाटील यांची निवड


अध्यक्षपदी डॉ.अशोक चौसाळकर व उपाध्यक्षपदी डॉ.सौ. भारती पाटील यांची निवड

*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


इचलकरंजी : समाजवादी प्रबोधिनीच्या अध्यक्षपदी ख्यातनाम विचारवंत प्रा.डॉ.अशोक चौसाळकर आणि उपाध्यक्षपदी राज्यशास्त्र व गांधी विचारांच्या ज्येष्ठ अभ्यासक प्रा.डॉ. भारती पाटील तर सदस्यपदी अन्वर पटेल यांची निवड समाजवादी प्रबोधिनीच्या विशेष सर्वसाधारण सभेत एकमताने करण्यात आली.समाजवादी प्रबोधिनीचे अध्यक्ष ज्येष्ठ अर्थतज्ञ कालवश डॉ.जे एफ.पाटील कालवश झाल्याने ही विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती.प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.त्यातून आचार्य शांताराम गरुड,कालवश डॉ.एन.डी.पाटील ,शहीद गोविंद पानसरे,प्रा.डॉ.जे.एफ.पाटील यांच्यासह सर्वांच्या योगदानाचा उल्लेख करून प्रबोधिनीच्या आजवरच्या व पुढील वाटचालीची दिशा स्पष्ट केली.तसेच सर्वांगीण समतेची बांधिलकी मानणाऱ्या सर्वांनी प्रबोधिनीच्या कामात ,उपक्रमात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले. प्रारंभीआचार्य गरुड यांच्या ९५ व्या जन्मदिना निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.ज्येष्ठ नेते जयकुमार कोले यांच्या हस्ते नव्याने निवड झालेल्या सर्वांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.


नूतन अध्यक्ष प्रा.डॉ.अशोक चौसाळकर म्हणाले,समाजवादी प्रबोधिनीशी मी गेली चाळीस वर्षे जोडला गेलो आहे.आज सर्वांनी एकमताने अध्यक्षपदी माझी निवड केली याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे.गांधीवाद, मार्क्सवाद, लेनिनवाद,भारतीय राज्यघटना,भारतीय राष्ट्रवाद अशा सर्व तत्वज्ञानांचे सैद्धांतिक प्रबोधन करण्याचे काम प्रबोधिनी करत आली आहे.ते काम नव्या संदर्भात नव्या आशयाच्या मांडणीसह आपण अधिक उपक्रमशील राहूया.गेली चौतीस वर्षे सुरू असलेले प्रबोधन प्रकाशन ज्योती मासिक,तीस हजारांवर ग्रंथांनी समृद्ध असलेले प्रबोधन वाचनालय यासह सर्वच उपक्रम अधिक व्यापक करण्यासाठी हे काम वाढले पाहिजे असे वाटणाऱ्या प्रत्येकाने सर्वतोपरी व सक्रिय सहभाग नोंदवला पाहिजे.तसेच आर्थिक सहाय्यही केले पाहिजे.

     यावेळी प्राचार्य डॉ. टी.एस. पाटील,शशांक बावचकर,प्राचार्य आनंद मेणसे,डॉ.चिदानंद आवळेकर ,शिवाजीराव होडगे,प्रा.विजयकुमार जोखे ,अन्वर पटेल या मध्यवर्ती कार्यकारिणी सदस्यांसह जयकुमार कोले, दशरथ पारेकर,एफ. वाय. कुंभोजकर, प्रा.रमेश लवटे,शिवाजी दुर्गाडे,शिवाजी रुमाले आदींनी आपले विचार मांडले.या सभेला पांडुरंग पिसे,दयानंद लिपारे,तुकाराम अपराध, डी.एस. डोणे, रामभाऊ ठिकणे,सौदामिनी कुलकर्णी,प्रा.डॉ.तुषार घाटगे,अशोक शिरगुप्पे ,सचिन पाटोळे,नौशाद शेडबाळे,अश्विनी कोळी, किर्तिकुमार दोशी,शकील मुल्ला,डी. टी.शिंगे,आनंदराव नागावकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा