Breaking

गुरुवार, १६ फेब्रुवारी, २०२३

*जयसिंगपूर कॉलेजच्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी लाक्षणिक उपोषणात नोंदविला सक्रिय सहभाग*

 

लाक्षणिक उपोषणात सहभागी झालेले शिक्षकेत्तर कर्मचारी


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर  येथे आज दि.१६ फेब्रुवारी,२०२३ ला महासंघाच्या आदेशानुसार महाविद्यालयाचे सर्व  कर्मचाऱ्यांनी लाक्षणिक उपोषणाच्या माध्यमातून शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या शासन धोरणाला विरोध दर्शविला.शासनाच्या बेजबाबदार व अन्यायी धोरणाचा असंतोष कर्मचाऱ्यांच्या मनात खदखदत आहे. या पार्श्वभूमीवर जयसिंगपूर कॉलेजमधील १०० टक्के कर्मचाऱ्यांनी लाक्षणिक उपोषणामध्ये सहभाग नोंदविला.

      शासनाच्या आश्वासित प्रगती योजना,10,20,30, जुनी पेन्शन, सातवा वेतन आयोगाचा आजपर्यंतचा फरक व शिक्षकेतर कर्मचारी भरती अशा विविध प्रकारच्या मागण्या होत्या.यासाठी महासंघाच्या आदेशानुसार महाविद्यालयाचे सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आज  सकाळी १०.०० वाजता कॉलेजच्या मुख्य इमारती समोर एकत्रित येऊन शासनाच्या जुलमी धोरणा विरोधात व विविध मागण्यांसाठी जोरदार घोषणा दिल्या.घोषणांनी परिसर दुमदुमून निघाला. घोषणाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या मनातील असंतोष समोर दिसून येत होता.

     मुळात दि.२ फेब्रुवारी,२०२३ पासून प्रलंबित असणाऱ्या विविध  मागण्यांसाठी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्याचाच भाग म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रात लाक्षणिक उपोषणाच्या माध्यमातून शिक्षकेत्तर कर्मचारी विरोधी शासन धोरणाला विरोध दर्शविला.

      महाविद्यालयाचे कामकाज बंद करून या एक दिवशीय लाक्षणिक उपोषणात संजीव मगदूम,ए.बी. कांबळे,संजय चावरे, आय.आर.पाटील,श्रीमती के.ए.झेले,सतिश शेटे, ए.एम.पाटील, सुहास हिरुकडे,श्रीमती के. व्ही. शेट्टी,प्रदीप सुतार, सुनील कोळी, पी.जे.पाटील, व्ही.के.मोहरे ,सौ.एस.वाय.जाधव, श्री.डी.पी.लिंगे,   एन.जी.कांबळे,एस. ए. वास्कर,बाहुबली भनाजे, नेमिनाथ मगदूम, श्री बी.जे. कुंभार, श्री.जे.बी.कांबळे,श्री.आर.एन. खराडे , श्री.डी.एम. तांबोळी,श्री.एस. व्ही.हजारे, एच.जी.पवार,श्री.प्रदीप पाटील,श्री के.व्ही. कोरीशेट्टी,श्री.आर.एस. माने, श्री.डी.बी.पाटील, श्री.पी.पी.कदम आणि व्ही.आर.मेहता सहभागी झाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा