Breaking

मंगळवार, ७ फेब्रुवारी, २०२३

*वीज दरवाढीच्या विरोधात हरकती द्याव्यात : स्वराज्यक्रांती जनआंदोलनचे आदम मुजावर यांचे आवाहन*


स्वराज्य क्रांती जन आंदोलनाचे अध्यक्ष आदम भाई मुजावर, जिल्हाध्यक्ष कैलास काळे व अन्य पदाधिकारी


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : वीज वितरण कंपनीने केलेल्या प्रस्ताविक दरवाढीवर विरोध नोंदवून सादर कराव्यात असे आवाहन स्वराज्य क्रांती जन आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष आदम मुजावर यांनी केले आहे. 

        यावेळी माहिती देताना स्वराज्यक्रांती जन आंदोलनाचे मुजावर म्हणाले, दिल्ली राज्यात २०० युनिट वीज पूर्णपणे मोफत आहे शिवाय तेथील विजेचे युनिटचे दरही कमी आहे. वीज वितरण कंपनीने योग्य नियोजन केल्यास दरवाढ करावी लागणार नाही. वीज दरवाढ करणे हा पर्याय नसून विजेची अंतर्गत गळती थांबवली पाहिजे, थकबाकी वसुली करण्याचा प्रयत्न केला पाहिजे इतर खर्च कमी करून भ्रष्टाचार कमी करणे गरजेचे आहे. वीज कंपनीने जाहीर केलेली प्रस्तावित दरवाढ ही सर्वसामान्य जनतेची लूट ठरू शकते. त्यामुळे ही वाढ रद्द करण्यासाठी विरोध नोंदवा असे आवाहन केले.

     या शिवाय या दरवाडी विरोधाच्या हरकती एकत्रित जमा करून शिरोळ तालुक्याचे आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे सुपूर्त करून आमच्या भावना मंत्रालयात पोहोचवण्याची विनंती करणार असल्याचेही मुजावर यांनी सांगितले. जयसिंगपूर शहर आणि परिसरातील वीज ग्राहकांनी वीज दरवाढीला विरोध नोंदवून आपल्या हरकती जमा कराव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.

      यावेळी जिल्हाध्यक्ष कैलास काळे,  जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गाडीवडर व तालुका अध्यक्ष गजानन पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा