![]() |
मार्गदर्शन करताना प्रा.डॉ.प्रकाश कांबळे , सुयेकचे अध्यक्ष डॉ. राहुल म्होपरे, प्राचार्य डॉ.चिकुर्डेकर व प्रा.डॉ.डी.आर.धेडे |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कोल्हापूर : यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय वारणानगर अर्थशास्त्र व वाणिज्य विभाग आणि शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनोमिक्स असोसिएशन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानमालेतील 18 वे पुष्प "अंदाजपत्रक 2022- 23 आणि भारताचा विकास" या विषयावर डॉ. पी. एस. कांबळे (सुयेकचे माजी अध्यक्ष व वरिष्ठ प्राध्यापक, अर्थशास्त्र अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) यांनी गुंफले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ.प्रकाश चिकुर्डेकर होते तर शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स असोसिएशन चे विद्यमान अध्यक्ष डॉ. राहुल शं. म्होपरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. डॉ.प्रकाश कांबळे मार्गदर्शन करताना म्हणाले की, अर्थसंकल्प 2022 - 23 हा शेती क्षेत्रातील पायाभूत सेवा सुविधा, फलोत्पादन विकास, अन्न सुरक्षितता त्यामध्ये भरड धान्य उत्पादन वाढ घडवून आणणारा आहे. औद्योगिक विकासासाठी प्रत्येक राज्य सरकारने पायाभूत सेवा सुविधांवर अधिक खर्च केला पाहिजे. त्यासाठी राज्य सरकारांना पुढील ५० वर्षासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्याची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. रेल्वे विकासासाठी 2.4 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे, तर उच्च शिक्षण क्षेत्राकडे मात्र फारच दुर्लक्ष झाले आहे. वाढत्या आर्थिक विषमतेचा विचार करता विषमता या शब्दाचा उल्लेख सुद्धा अर्थसंकल्पात केला गेला नाही.
डॉ. राहुल शं. म्होपरे यांनी शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स असोसिएशनच्या वतीने व्याख्यानास शुभेच्छा देऊन सुएकची आणि विशेष व्याख्यानमालेमागची भूमिका स्पष्ट केली. तसेच यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाने अठरावे व्याख्यान आयोजित केले त्याबद्दल अभिनंदन ही केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य प्रो. डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांनी अर्थशास्त्र आणि वाणिज्य भागातील विविध उपक्रम आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमात अर्थशास्त्र विषयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. एम. ए. अर्थशास्त्र विषयात दुसरा आलेला प्रवीण सातवेकर पाचवा क्रमांक आलेला स्वप्निल झेंडे तर बी.ए.भाग दोन गुणवत्ता यादीत आलेली समीक्षा दळवी यांचा प्रमुख पाहुणे डॉ. पी. एस. कांबळे, डॉ.राहुल शं. म्होपरे व प्राचार्य प्रो. डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. डी. आर. धेडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सी.आर.जाधव तर आभार वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.आर. बी. बसनाई यांनी मांडले.व्याख्यानास डॉ. संदीप जाधव, प्रा. प्रवीण सातवेकर प्रा. सुप्रिया कांडगावकर, इतर प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा