पत्रकार मालोजीराव माने, कार्यकारी संपादक
सांगली : येणाऱ्या महिला दिनाचे औचित्य साधून श्रीमती पुतळाबेन शाह कॉलेज ऑफ एज्युकेशन सांगली आणि वितराग कॉम्प्युटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली शहरातील शालेय विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन्स चे वाटप करण्यात आले. सोबतच त्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शनही करण्यात आले.
श्रीमती पुतळाबेन शाह कॉलेजचे प्राचार्य डॉ.बी.पी. मरजे यांच्या मार्गदर्शनाखाली द्वितीय वर्ष शालेय आंतरवासिता मधील अभिरूप मुख्याध्यापक स्नेहल आळंदे, सुनील माळी, भाग्यश्री गस्ते, रत्नप्रभा तलवार, दिपाली विभुते, ज्ञानदीप कांबळे, शुभम कोळेकर यांनी व त्यांच्या सहकारी विद्यार्थी शिक्षकांनी या सॅनिटरी नॅपकिन्स वाटपाचा उपक्रम पार पडला.
यावेळी शहरातील सिटी हायस्कूल, हि.हा.रा.ची.पटवर्धन हायस्कूल, कै. ग.रा.पुरोहित, रा. स.कन्या शाळा, श्रीराम रामदयाल मालू हायस्कूल, अभिनव हायस्कूल, गोसलीया हायस्कूल या शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स चे वाटप करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा