✍🏼 पत्रकार मालोजीराव माने, कार्यकारी संपादक
सांगली: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानासाठी अभिवादन म्हणून ‘२७ फेब्रुवारी’ हा ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने श्रीमती पुतळाबेन शाह कॉलेज ऑफ एज्युकेशन, सांगली येथे २७ फेब्रुवारी २०२३ रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. मरजे यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली मराठी विभागप्रमुख प्रा. दयानंद बोंदर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमासाठी सौ. आरती क्षीरसागर (प्र. प्राचार्य, राजमाता अध्यापक विद्यालय, सांगली.) प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरूवात पुस्तक प्रदर्शनाच्या उद्घाटनाने झाली. भाषा मंडळ व वाचन कट्टा यांच्या मार्फत ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच बरोबर प्रा. डॉ. एन. डी. इंदलकर त्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘माझी मराठीत स्वाक्षरी’ या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. बी. पी. मरजे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सौ. आरती क्षीरसागर यांनी बी.एड्. प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना मराठी साहित्याच्या इतिहासाविषयी तसेच साहित्य प्रकारांविषयी माहिती दिली.
![]() |
विविध साहित्य प्रकार सादर करताना बी.एड विद्यार्थी |
त्याचबरोबर बी. एड्. प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी मराठी काव्याचे प्रकार, इतिहास व सादरीकरण अशा पध्दतीने विविध काव्य प्रकारांचे सादरीकरण केले. त्यामध्ये गणेश वंदन, ओवी, अभंग, गौळण, भारूड, पोवाडा, लावणी, हायकू, मुक्तछांदातील कविता, ग्रामीण कविता अशा विविध काव्यप्रकारांची माहिती सांगून त्यांचे सादरीकरण केले.
अध्यक्षीय भाषणामध्ये मा. प्राचार्य डॉ. बी. पी. मरजे यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे महत्त्व व्यक्त करून मराठी साहित्याचे वाचन व लेखन करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील जेष्ठ प्राध्यापक प्रो.डॉ.सुशिल कुमार, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.युवराज पवार, तसेच सर्व प्राध्यापक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती संजना आपटे यांनी केले. श्रीमती खदिजा शेख यांनी कार्यक्रमामध्ये उपस्थितांचे आभार मानले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती. भक्ती सिद्ध यांनी केले. या कार्यक्रमासाठी बी. एड्. प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा