Breaking

सोमवार, ६ मार्च, २०२३

अंधश्रद्धेला बळी पडून फसवणूक करून घ्यायची नसेल तर विज्ञानाचा हात धरा. - सुनीता माने, माजी मुख्याध्यापिका - रा. स.कन्या शाळा



✍🏼पत्रकार मालोजीराव माने, कार्यकारी संपादक 

सांगली: थोर भारतीय शास्त्रज्ञ सी.व्ही. रमण यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जाणारा राष्ट्रीय विज्ञान दिन श्रीमती पुतळाबेन शाह कॉलेज ऑफ एज्युकेशन सांगली येथे अनोख्या पद्धतीने व उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी महाविद्यालयाच्या विज्ञान मंडळाचेही उद्घाटन करण्यात आले. 

विविध उपक्रमांचे उद्घाटन करताना प्रमुख पाहुण्या सुनीता माने व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.बी.पी. मरजे सर


     प्रमुख पाहुण्या श्रीमती सुनीता माने व कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉ. बी.पी मरजे सर यांच्या हस्ते विज्ञान मंडळ, हस्तलिखित, सायन्स मॉडेल्स आणि भीत्तीपत्रके यांचे उद्घाटन करण्यात आले.

       विशेष म्हणजे यावेळी बी.एड विद्यार्थ्यांसोबत जिल्हास्तरीय विज्ञान स्पर्धेत भाग घेतलेल्या शालेय विद्यार्थ्यांना देखील आपल्या वैज्ञानिक मॉडेल्स सहित सहभागी करून घेतले गेले होते. 

वैज्ञानिक मॉडेल्स सादर करताना बी.एड प्रशिक्षनार्थी 

शालेय जिल्हास्तरीय विजेते विद्यार्थी मॉडेल्स सादर करताना 


      कॉलेजची विद्यार्थिनी माधुरी कोरे हिने दैनंदिन आयुष्यातील घडामोडी मध्ये काय विज्ञान असते याची ppt presentation द्वारे मांडणी केली.


श्रीमती सुनीता माने मार्गदर्शन करताना 


     प्रमुख पाहुण्या सुनीता माने यांनी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून अंधश्रद्धा झटकून देण्याचा सल्ला दिला. बुवाबाजी, चमत्कार हे सगळं थोतांड आहे, प्रत्येक रुढीमागे, सणांमध्ये विज्ञान आहे आणि आपण ते समाजासमोर मांडले पाहिजे. आजूबाजूचे निरीक्षण केले पाहिजे व पडणाऱ्या प्रत्येक ' का ' चा शोध घेतला पाहिजे, असे मार्गदर्शन केले.

      कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य मरजे सरांनी आपलं वैज्ञानिक ज्ञान समाजाच्या भल्यासाठी वापरा असं विद्यार्थ्यांना आवाहन केले. 

     कार्यक्रमासाठी ज्योती कुल मार्गदर्शक प्रा.डॉ.सुशील कुमार, श्रीमती गायत्री जाधव,  प्रा. डॉ.युवराज पवार, प्रा.डॉ. नवनाथ इंदलकर, प्रा.दयानंद बोंदर, प्रा.मुक्ता पाटील, ग्रंथपाल संध्या यादव व प्रथम व द्वितीय वर्ष विद्यार्थी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा