![]() |
अग्नी आपत्तीचे प्रात्यक्षिक |
✍🏼मालोजीराव माने, कार्यकारी संपादक
फोटो - ज्ञानदीप कांबळे
सांगली : जागतिक महिला दिनानिमित्त श्रीमती पुतळाबेन शाह कॉलेज ऑफ एज्युकेशन, सांगली येथे गुरुवार दिनांक ९ मार्च रोजी सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका, अग्निशमन व आणीबाणी सेवा विभागाच्या वतीने अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम पार पडला.
![]() |
मार्गदर्शक विजय पवार यांचे स्वागत करताना प्रा.डॉ.सुशील कुमार सर |
मुख्य अग्निशमन अधिकारी मा. श्री.विजय पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यामधे त्यांनी आग लागली तर काय करावे, आग लागूच नये म्हणून काय करावे तसेच इतर विविध प्रकारच्या आपत्तिविषयी मार्गदर्शन केले.
![]() |
बी.एड च्या विद्यार्थिनी विद्यार्थ्यांना आप्पत्ती विषयक मार्गदर्शन करताना अग्निशमन अधिकारी |
![]() |
विद्यार्थ्यांनी स्वतः प्रात्यक्षिके करून पाहिली |
जीवरक्षण करण्यासाठी आणि तुमच्या घराला आगीचा धोका पोहचू नये म्हणून या आहेत १० टिपा
१. विजेची हाताळणी सुरक्षितपणे करण्यावर भर द्या.
सर्किट ब्रेकर लावा. एकाच प्लगवर अनेक उपकरणे लावू नका.खराब झालेल्या वायर्स बदला.
२. स्वयंपाक काळजीपूर्वक करा. गॅसवर काही शिजत ठेवलं असेल तर तेथेच उपस्थित राहा.
स्वयंपाक घरात काम करीत असताना ढिले कपडे वापरणे टाळा.
३.काडीपेटी व गॅस लाइटर मुलांपासून दूर ठेवा.
४. आग लागली तर गोंधळून जाऊ नका.
आग विझवण तुमच्या आटोक्यात असेल तरच प्रयत्न करा अन्यथा अग्निशमन दलाला बोलवा. टॉयलेटमध्ये आसरा घेऊ नका. लिफ्टचा वापर टाळा जिन्याने खाली उतरा.
५. सदैव तत्पर रहा.
बाहेर पडण्याचे किमान दोन तरी मार्ग ठरवा तुमच्या कुटुंबियांसमवेत प्रात्यक्षिक करून पहा.
६. धुरापासून वाचण्यासाठी रांगत जा.
आगीपासून निर्माण होणारा धूर श्वासावाटे आत जाऊ देऊ नका. त्याऐवजी जमिनीवरुन रांगत रांगत पुढे चला आणि सुटकेच्या मार्गापर्यंत पोहचा. स्वच्छ हवा जमिनीपासून काही अंतरापर्यंतच असते.
७. तुमचे कपडे पेटले तर सैरावैरा धावू नका.
तुमच्या कपड्यांनी पेट घेतला तर ती आग विझवण्यासाठी जमिनीवर पडा आणि लोळा, आग विझेपर्यंत हे करा. थंड पाणी ओतल्यास उत्तम.
८. भाजल्यावर प्रथमोपचार करा.
व्यक्ती किरकोळ भाजली असेल तर भाजलेल्या भागावरून १० मिनिटे तरी थंड पाणी जाऊ द्या. डॉक्टरांशी संपर्क साधा.
९. सुरक्षा उपकरणे बसवा.
आग आणि धुराची सूचना देणारा अलार्म तुम्हाला तात्काळ सावध करेल. अग्निशमन करणारे यंत्र सहज हाती लागेल अशा रितीने ठेवा.
१०. आग लागली तर अग्रिशमन दलाला बोलवायला उशीर करू नका. त्यासाठी डायल करा १०१ हा नंबर डायल करा
सांगली : ०२३३-२३७३३३३, २३२५६१२ मिरज
कोणत्याही आपत्ती मध्ये आपला जीव सांभाळून इतरांची मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. त्यासाठी सर्वांनी तत्पर असले पाहिजे, हीच खरी देशसेवा आहे. -
मा.प्राचार्य डॉ.बी.पी. मरजे
कॉलेजचे माननीय प्राचार्य डॉ.बी.पी. मरजे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्योती कुलामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते.
यावेळी कॉलेजचे ज्येष्ठ प्राध्यापक डॉ.सुशील कुमार, प्रा. डॉ. युवराज पवार, प्रा.डॉ.नवनाथ इंदलकर, ग्रंथपाल सौ. संध्या यादव, प्रा.दयानंद बोंदर, प्रा.गायत्री जाधव, प्रा.वैशाली गायकवाड, प्रा.मुक्ता पाटील आणि प्रथम व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा