![]() |
प्रमुख पाहुण्या |
✍🏼 पत्रकार मालोजीराव माने, कार्यकारी संपादक
फोटो - सम्यक संबोधी
सांगली : येथील श्रीमती पुतळाबेन शाह कॉलेज ऑफ एज्युकेशन मध्ये दरवर्षी वेगवेगळ्या अनोख्या पद्धतीने जागतिक महिला दिन साजरा केला जातो. यावर्षीचा महिला दिन कला क्षेत्रातील महिलांचा सन्मान करून साजरा केला गेला. मेरी आवाज ही पहचान है ! या नावाने हा कार्यक्रम पार पडला.
नुकतेच गाणकोकिळा भारतरत्न स्व. लता मंगेशकर आणि लावणी सम्राज्ञी स्व. सुलोचना चव्हाण यांचे दुःखद निधन झाले तसेच कवयित्री शांता शेळके जन्मशताब्दी वर्ष म्हणून त्या सर्वांना आदरांजली वाहण्यासाठी त्यांच्या आठवणीत कला क्षेत्रातील महिलांचा सन्मान करून जागतिक महिला दिन साजरा केला गेला.
यावेळी, प्रमुख पाहुण्या म्हणून कला क्षेत्रातील
१) श्रीमती अंजली तेलंग - पेटी वादक
२) श्रीमती मनिषा दातार - तबला वादक
३) श्रीमती स्वरदा खाडिलकर - शास्त्रीय गायक
४) श्रीमती भक्ती सिध्द - गायक (संगीत विशारद)
५)श्रीमती गौरी लेले - किर्तनकार
६) श्रीमती श्रेया ताम्हणकर - बासरी वादक ( M.A gold medalist )
७) श्रीमती प्रतिभा मगदूम - शाहीर / गायक
८) श्रीमती हर्षाली बेलवलकर, नृत्यांगना, अभिनेत्री, कथ्थक विशारद
९) श्रीमती संजना आपटे - कथक नृत्यांगना
इत्यादींना आमंत्रित केले गेले होते. यावेळी त्यांनी आपली कलाही सादर केली.
![]() |
श्रीमती स्वरदा खाडिलकर,श्रीमती अंजली तेलंग व श्रीमती मनिषा दातार कला सादर करताना |
![]() |
नर्तिका - अभिनेत्री हर्षाली बेलवलकर |
![]() |
कथ्थक नृत्यांगना संजना आपटे नृत्य सादर करताना |
कॉलेजचे प्राचार्य माननीय डॉ.बी.पी. मरजे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथपाल श्रीमती संध्या यादव आपल्या सहकारी शिक्षकांच्या मदतीने दरवर्षी अनोख्या पद्धतीने जागतिक महिला दिन साजरा करतात.
![]() |
फलक लेखन - सुनील माळी |
विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी महिलांबाबत सन्मानाची भावना दाखवत सर्व महिला मान्यवर व सहकारी विद्यार्थिनींचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
कॉलेजचे ज्येष्ठ प्राध्यापक डॉ.सुशील कुमार सर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल श्रीमती संध्या यादव, सूत्रसंचालन प्रा.गायत्री जाधव, वैशाली गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.मुक्ता पाटील यांनी केले.
यावेळी कॉलेजचे प्राचार्य माननीय डॉ.बी.पी. मरजे सर, ज्येष्ठ प्राध्यापक डॉ.सुशील कुमार, प्रा. डॉ. युवराज पवार, प्रा.डॉ.नवनाथ इंदलकर,ग्रंथपाल सौ. संध्या यादव प्रा.दयानंद बोंदर, प्रा.गायत्री जाधव, प्रा.वैशाली गायकवाड, प्रा.मुक्ता पाटील आणि प्रथम व द्वितीय वर्ष विद्यार्थी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा