![]() |
प्रा.डॉ. चंद्रकांत लंगरे, इंग्रजी विभाग, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कोल्हापूर : अमेरिकेतील जेम्स मेडिसन विद्यापीठातील महात्मा गांधी अभ्यास केंद्राच्या वतीने येत्या २७ व २८ सप्टेंबर २०२३ रोजी प्रा. टेरी बाईटझल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित 'बाईटझल २०२३’ परिसंवादासाठी विशेष साधनव्यक्ती म्हणून शिवाजी विद्यापीठातील इंग्रजी अधिविभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. चंद्रकांत लंगरे यांना विशेष साधनव्यक्ती म्हणून निमंत्रित केले आहे.
या परिसंवादामध्ये ते ‘महात्मा गांधी ऑन सेल्यूलॉईड' या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. यासाठी त्यांना जेम्स मॅडिसन विद्यापीठाकडून १५०० डॉलर्सचे अनुदान मंजूर झाले आहे. यापूर्वी डॉ. चंद्रकांत लंगरे यांनी महात्मा गांधी सेंटर फॉर ग्लोबल नॉन-व्हायोलन्स, जेम्स मेडीसन युनिव्हर्सिटी आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या माध्यमातून राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या १५० व्या जयंती निमित्ताने गांधी विचार आणि चरित्राचा अभ्यास करणारे दोन खंडीय वैश्विक ग्रंथ प्रा. टेरी बाईटझल यांच्यासोबत संपादित केले आहेत.
डॉ. लंगरे यांनी यापूर्वी अमेरिका, इंग्लंड, इटली आणि पोलंड या देशांतील नामवंत विद्यापीठांत आपले शोधनिबंध सादर केले आहेत. ‘बाईटझल-२०२३’ या परिसंवादासाठी त्यांना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांचे मार्गदर्शन आणि इंग्रजी अधिविभाग प्रमुख डॉ. तृप्ती करेकट्टी सहकार्य लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा