Breaking

शुक्रवार, २४ मार्च, २०२३

*रयत शिक्षण संस्था ही अतिशय शक्तिशाली संस्था असून कर्मवीर विद्यापीठास जागतिक दर्जाचे घडविण्याचे मानस: कुलाधिकारी मा.चंद्रकांत दळवी*


मा. कुलाधिकारी यांचे स्वागत करताना डॉ. अनिल पाटील कुलगुरू डी. टी.शिर्के सोबत प्र. कुलसचिव डॉ.विजय कुंभार अन्य मान्यवर


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


सातारा : विद्यापीठ चालवणे हे आव्हान असले तरी आमची बलस्थाने म्हणजे ए प्लस दर्जाची कॉलेजेस असून ती स्वायत आहेत. देशाची लोकसंख्या ओझे होते तेंव्हा त्याच लोकसंख्येचा उपयोग संधी म्हणून करता येतो त्या प्रमाणेच आपल्याला करावे लागेल.रयत शिक्षण संस्था ही अतिशय शक्तिशाली संस्था आहे.  या विद्यापीठाचा कुलाधिकारी म्हणून काम करण्याची मोठी संधी  मला  मिळाली आहे.  आपले कर्मवीर भाऊराव पाटील  विद्यापीठ हे ग्रामीण भागातील अतिशय चांगल्या उपलब्धी असलेले विद्यापीठ आहे. विकासाच्या वाटेवर घेऊन जाणे ही आपली जबाबदारी आहे. शिक्षणाचा दर्जा उच्चतर राहील याच्यासाठी जे जे करावे लागेल ते आपण करू.प्रयोग करण्यासाठी आपल्याला आता खूप स्वातंत्र्य मिळाले आहे. तुलनात्मक दृष्ट्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ हे जागतिक दर्जाचे विद्यापीठ करू ‘’असे अभिवचन कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त प्रथम कुलाधिकारी मा. चंद्रकात दळवी यांनी दिले. आज येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचा कार्यभार घेण्यासाठी ते आले होते त्यावेळी विद्यापीठाने यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये आयोजित केलेल्या स्वागत समारंभात ते बोलत होते.  

   आपल्या भाषणात रयत शिक्षण संस्थेचा संदर्भ देताना ते म्हणाले ,रयतचे हायस्कूल आमच्या गावात नसते तर मी या पदावर नसतो. कर्मवीरांच्या नावाने असलेल्या विद्यापिठाचा कुलाधिकारी होणे हे माझ्यासाठी खूप संस्मरणीय व भाग्यशाली असा दिवस आहे. मी हनुमान विद्यालय निढळ येथे शिकलो.आहे ग्रामीण जीवन मी अनुभवले आहे.हे पद म्हणजे एक नैतिक जबाबदारी आहे. विद्यापीठातील सर्व प्राध्यापक हे सारथी आहेत. मी वेळच्या वेळी निर्णय घेऊन कामे पूर्ण करीन अशी ग्वाही त्यांनी दिली.  कुलगुरू प्रा.डी.टी.शिर्के यांच्या ज्ञानाचा फायदा घेऊन आपण विद्यापीठाचे काम गतिमान करू असेही यावेळी त्यांनी सांगितले. 

                 अध्यक्षीय भाषणात रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन  डॉ.अनिल पाटील म्हणाले ‘’ कर्मवीरांनी अनेक वेळा पाहिलेले स्वप्न आज पूर्ण होत आहे. अण्णांचे स्वप्न पूर्ण करताना प्रचंड झगडावे लागले. २०१३ पासून आम्ही स्वायत्त होण्यासाठी काम केले.हातपाय बांधून पोहण्याच्या शर्यतीत भाग घेणे त्यावेळी शक्य नव्हते.जानेवारी १९ ला अर्ज केला.कस्तुरी मृगासारखी ही गोष्ट आहे. आज जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ बनवण्याची ताकद आपल्यात आहे. ५० वर्षे वाटचाल केलेली कॉलेज,सर्व प्रकारची उत्कृष्टता आपण मिळवली आहे. उशीर झाला असला असला तरी पडलेले दान अप्रतिम आहे. अण्णांच्या नावे कॉलेज असल्यामुळे त्याला ग्लोबल दर्जा हवा आहे. हे विद्यापीठ आमच्या रयतच्या अनेक कॉलेजला मार्गदर्शक ठरावे हीच इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.डी.टी.शिर्के यांनी प्रास्ताविकात ५ महिन्यात केलेल्या कामकाजाचा  आढावा घेतला. पी.एच.डी साठी संशोधन ,  चार चेअर व चार स्कूल ची निर्मिती यासाठीची तयारी झाल्याची  माहिती त्यांनी यावेळी दिली. या विद्यापीठाने मुळ धरले असून आता यापुढे ते  झेप घेईल असे सांगत त्यांनी मा.चंद्रकात दळवी यांचे अभिनंदन केले.  रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील यांनी पुष्प गुच्छ, शाल व पुस्तक देऊन मा. दळवी यांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमात कुलाधिकारी यांचा परिचय प्रा.डॉ.जय चव्हाण यांनी करून दिला. प्रा.डॉ.विजय कुंभार यांनी आभार मानले .सूत्र संचालन प्रा.डॉ.मनीषा पाटील यांनी केले.

     यावेळी रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर,सहसचिव प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे,प्राचार्य डॉ.बी.टी.जाधव ,प्राचार्य डॉ.बाळ कांबळे इत्यादी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.  निढळ गावचे ग्रामस्थ  तसेच तिन्ही कॉलेजचे प्राध्यापक ,प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा