Breaking

मंगळवार, २१ मार्च, २०२३

*शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या संचालक पदी प्रा.डॉ. तानाजी महादेव चौगले यांची निवड*


प्रा.डॉ.तानाजी महादेव चौगले, संचालक,राष्ट्रीय सेवा योजना कक्ष, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर 


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या संचालक पदी भोगावती महाविद्यालय, कुरुकलीचे प्राणीशास्त्र विभाग प्रमुख व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यशील कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. तानाजी चौगले यांची तीन वर्षासाठी निवड झाली आहे.

       प्रा.डॉ. चौगले यांचा शैक्षणिक प्रवास एकदम प्रभावी असून त्यांनी प्राणीशास्त्र विषयातून एम.एस्सी., पीएच.डी.चे शैक्षणिक पदवी संपादन केली आहे. त्याचबरोबर ते सेट परीक्षा उत्तीर्ण आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र अभ्यास मंडळावर त्यांची सदस्यपदी निवड झाली आहे. त्यांचा शैक्षणिक व संशोधनात्मक गुणवत्तेचा पताका राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वीपणे फडकविला आहे. यूजीसी फंडेड एक रिसर्च प्रोजेक्ट पूर्ण केला असून दोन पुस्तके प्रकाशित झाले आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये त्यांनी दैदीप्यमान कामगिरी केली आहे. अध्यापनाची २३ वर्षे पूर्ण करीत  अनेक शैक्षणिक मंडळाच्या माध्यमातून त्यांनी काम केलं आहे. डॉ. चौगले यांनी सामाजिक व शैक्षणिक विषयावर शेकडो व्याख्याने देऊन विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले आहे. सध्या डॉ.चौगले यांच्याकडे चार विद्यार्थ्यांना पीएच.डी. मार्गदर्शक म्हणून लाभले आहेत. 

     डॉ. तानाजी चौगले हे लायन्स क्लब कोल्हापूर सदस्य, सेक्रेटरी, अध्यक्ष २०१६-१७ (शंभराव्या वर्षीचे अध्यक्ष) म्हणून विराजमान ,लायन्स क्लबच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग,राष्ट्रीय सेवा योजना दत्तक गावांमध्ये २००० पेक्षा जास्त लोकांचे मोफत रक्त गट तपासणी, ५०० पेक्षा जास्त लोकांचे मोफत रक्त साखर तपासणी,पूर परिस्थितीमध्ये अनेक गावांना साहित्य वाटपामध्ये विशेष सक्रिय सहभाग,डॉ. चौगुले यांनी कोविड महामारीच्या काळात जीवाची बाजी लावून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी अहोरात्र प्रयत्न केले.त्याचबरोबर माझं गाव कोरोनामुक्त गाव या अभियानांतर्गत  मास्क वाटप आणि कोविड प्रिव्हेन्शन साठी विशेष प्रयत्न, करियर कौन्सिलिंग च्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी संपूर्ण मार्गदर्शन,विविध विषयावर शेकडो व्याख्यानांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले आहे."शिव विचार जागर मोहिमेअंतर्गत" कुरुकली ते रायगड पदयात्रेमध्ये सलग ३ वर्षे सक्रिय सहभाग, अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत परिसरातील शेतकऱ्यांसाठी कार्यशाळांचे यशस्वी आयोजन, पशुसंवर्धनासाठी विविध विषयावर कार्यशाळांचे यशस्वी आयोजन आशा असंख्य रचनात्मक व प्रेरणादायी उपक्रमाच्या माध्यमातून केलेले सेवाभावी कार्य कौतुकास्पद आहे. उक्ती पेक्षा कृतीला महत्व देणाऱ्या व्यक्तीमत्वा पैकी एक म्हणून नावलौकिक आहे.

        शालेय जीवनापासून सेवावृत्ती भावनेने प्रेरित असल्याने ते आज तागायात त्यांनी उत्तम सामाजिक कार्य केले आहे. विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते म्हणून ते अखंडितपणे कार्यरत आहेत. शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघटनेच्या (सुटा) माध्यमातून प्राध्यापकांच्या न्याय- हक्कासाठी ते लढत असतात. अत्यंत संयमी मात्र प्राप्त परिस्थितीनुसार सामाजिक भान ठेवून समाजाप्रती ते कार्यरत आहेत. त्यांचं कार्य व व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने अनेक घटकांना प्रेरणादायी आहे.

     राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून गेल्या चार वर्षात केलेले काम विशेष व उल्लेखनीय आहे. संघटनात्मक व प्रशासकीय अनुभव व सामाजिक कामातील हातोटी असल्याने शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक पदाची जबाबदारी प्रामाणिकपणे व यशस्वीपणे पार पडतील याबाबत दुमत नाही.

        प्रा.डॉ. तानाजी चौगले हे विद्यार्थी प्रिय असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे एक सक्षम व प्रभाव व्यक्तिमत्व म्हणून परिचयाचे आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या नेतृत्वाने दाखविलेला विश्वास सार्थक करीत कामाच्या माध्यमातून कार्यशील राहणार आहे.

      जय हिंद न्यूज नेटवर्कशी बोलताना डॉ. चौगले म्हणाले, विद्यार्थी हित डोळ्यासमोर ठेवून एन.एन.एस. स्वयंसेवक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण कल्याण- विकासासाठी व शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता मानांकनासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहणार आहे. तसेच कार्यक्रम अधिकाऱ्यांच्या माध्यमातून एन.एन.एस.ला रचनात्मक उपक्रमाच्या माध्यमातून  वेगळेपण देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.डी.टी.शिर्के, प्र-कुलगुरू, प्रा. डॉ.पी.एस.पाटील व कुलसचिव प्रा.डॉ. व्ही.एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत राहणार आहेत. त्यांच्या या निवडीने समस्त कार्यक्रम अधिकारी व विद्यार्थी वर्गाकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

      प्रा.डॉ.तानाजी चौगले यांच्या निवडीबद्दल जय हिंद न्यूज नेटवर्क परिवाराच्या वतीने त्यांचे मनस्वी अभिनंदन व पुढील सामाजिक कार्यास खूप खूप शुभेच्छा!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा