![]() |
शिरोळ मध्ये मध्ये कडकडीत बंद ; शांतता पाळण्यासाठी झाली उच्चस्तरीय बैठक |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
शिरोळ : छत्रपती शिवाजी महाराज व इतिहासातील थोर महापुरुषांच्याबद्दल आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करून हिंदू धर्मियांच्या श्रद्धेचा व भावनांचा अवमान करण्याचा प्रकार घडला. त्याबद्दल ज्या तरुणाने शिरोळ पोलीस ठाण्यात तक्रार केली होती त्या युवकावर काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला आहे. या घटनेचा निषेध नोंदवत हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकत्यांनी आज शिरोळ शहर कडकडीत बंद करून या घटनेमधील दोषींक तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. या घटनेमुळे शिरोळ शहरात तणावपूर्ण बातावरण बनले आहे. यामुळे शहरात राज्य राखीव पोलीस दलाबरोबरच स्थानिक पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
गुरुवारी शिरोळ येथील निहाल शफिक शेख या युवकाने छ. शिवाजी महाराज थोर पुरुष पुथ्वीराज चौहान, तानाजी मालुसरे, महाराणा प्रताप व राजा जयसिंग यांच्याविषयी आक्षेपार्ह व्हिडिओ आपल्या मोबाईलच्या सोशल मीडियाच्या प्रोफाइलद्वारे प्रसारित करून हिंदू धर्मियांच्या श्रद्धाचा व भावनाचा अपमान करून वेगवेगळ्या धार्मिक समाजात द्वेषाची भावना व जातीय तेढ निर्माण होईल असे कृत्य केले होते. याबाबतची शेख याचे विरोधात शिरोळ पोलिस ठाण्यात स्वानंद महादेव पाटील या तरुणाने फिर्याद दाखल केली होती. त्यामुळे निहाल शेख याचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
स्वानंद पाटील या तरुणाने निहालच्या विरोधात गुन्हा दाखल केला असल्याचा द्वेष मनात धरून शुक्रवारी रात्री त्याच्यावर पाळत ठेवून तो कामावर जात असताना काही समाजकंटकांनी त्याच्यावर भ्याड हल्ला करून त्यास जखमी केले. यामुळे शिरोळ मधील सर्व हिंदुवादी संघटना व तरुण मंडळाचे कार्यकर्ते संतप्त झाले असून त्यांनी शनिवारी शिरोळ शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.शहरातील सर्व व्यापारी व व्यावसायिक दुकानदार आणि नागरिकांनी आपले सर्व व्यवहार- दुकाने बंद ठेवून या बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. शहरातील तरुण मंडळांनी मोटरसायकल रॅली काढून समाजकंटकांनी तरुणावर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या घटनेचा निषेध नोंदवला.
शिरोळ मधील पंचायत समिती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शिरोळ पोलिसांनी दंगलखोरांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी.
हल्ल्याच्या घटनेचा निषेध नोंदवत कार्यकर्ते येथील छपती शिवाजी तख्त येथे एकत्रित जमले त्या ठिकाणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई, भारतीय जनता युवा मोर्चाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष बजरंग काळे गुरुजी, शिरोळ शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष डी. आर. पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. झालेला घटनेचा निषेध नोंदवत त्यांनी पोलीस प्रशासन या घटनेचा तपास करीत असून यातील मुख्य आरोपी निहाल शेख यास अटक केली आहे. तसेच या प्रकरणातील दोषींना ताब्यात लवकरच घेतील त्यामुळे शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये याची दक्षता घ्यावी.
शांततेच्या मार्गाने या भ्याड हल्ल्याचा निषेध करावा असे आवाहन केले. उद्या १९ पासून सर्व व्यवहार सुरळीतपणे चालू होईल असा निर्णय घेण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा