Breaking

रविवार, २६ मार्च, २०२३

*अत्यंत दुर्देवी ! जयसिंगपुरातील डॉक्टरची इंजेक्शनचा अतिरिक्त डोस घेवून आत्महत्या*


मयत डॉ.अरुण कोळी, जयसिंगपूर 

*प्रा.डॉ. प्रभाकर माने :  मुख्य संपादक*


जयसिंगपूर : इंजेक्शनचा अतिरिक्त डोस घेऊन डॉक्टरने आत्महत्या केल्याची जयसिंगपूर येथील घटना घडली असून त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. आपल्या मृत्यूस कोणालाही  जबाबदार धरू नये असे डॉक्टर कोळी यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली.

     मयत डॉ. अरूण भूपाल कोळी (वय ४२) हे जयसिंगपूर येथे लक्ष्मी रोडलगत वैद्यकिय व्यवसाय करीत होते. त्यांनी इंजेक्शनद्वारे औषधांचा अतिरिक्त डोस घेतल्याने ते बेशुध्द पडले. ही घटना निदर्शनास आल्यानंतर त्यांचे भाऊ एकनाथ कोळी यांनी डॉ. अरूण कोळी यांना उपचारासाठी शहरातील सहाव्या गल्लीतील संजिवनी हॉस्पिटल येथे दाखल केले. शनिवारी दुपारी ३.२० वा. सुमारास उपाचारापूर्वीच डॉ. कोळी यांचा मृत्यू झाल्याची वर्दी डॉ. व्यंकटेश पत्की यांनी जयसिंगपूर पोलिसांना दिली.

      यानंतर पोलिसांनी तात्काळ प्राथमिक तपासा करीता हेडकॉन्स्टेबल चव्हाण, उपनिरीक्षक स्नेहल टकले, हेडकॉन्स्टेबल बाबाजान पटेल, पोलीस नाईक अभिजीत भातमारे यांचे पथक रवाना केले. डॉ. कोळी यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मिरज येथे शासकिय रूग्णालयात पाठविण्यात आला.

      डॉ.अरुण कोळींच्या आत्महत्येने सर्वत्र हळहल व्यक्त केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा