Breaking

सोमवार, २७ मार्च, २०२३

*जयसिंगपूर कॉलेजच्या प्रा.सौ.अंजना चौगुले-चावरे सावित्रीची लेकी-आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित*


प्रा.सौ.अंजना संजय चावरे,आदर्श शिक्षिका 

*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : जयसिंगपूर कॉलेजच्या प्रा.सौ.अंजना चौगुले-चावरे यांना सावित्रीची लेक - आदर्श शिक्षिका पुरस्काराने गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते मानपत्र देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी उद्यान पंडित मा. गणपतराव दादा पाटील व सावित्रीच्या लेकी चे संपादक मा. संजय सुतार व अन्य मान्यवर उपस्थित होते.


      प्रा.सौ.अंजना चौगुले-चावरे यांची शैक्षणिक पार्श्वभूमी एम.ए.,बी.एड., डिप्लोमा इन हिंदी ट्रान्सलेशन असून सध्या त्या शिवाजी विद्यापीठात हिंदी विषयातून पीएच.डी. पदवी चे शिक्षण संपादित करीत आहेत. मुळात अध्ययन व अध्यापनाची आवड असल्याने त्यांनी 'शिंपल्यातील मोती गाथा जिद्दी सुनंदाची' लिखित पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांना प्रभावित केले आहे. अभ्यासू  लेखिका,उत्तम सूत्रसंचालन, प्रभावी व सक्षम वक्तृत्व, सांस्कृतिक कला प्रशिक्षका, वेगवेगळ्या विषयावरील शेकडो व्याख्याने, पर्युषण पर्व, महिला सबलीकरण, हरवत चाललंय घराचे घरपण, आम्ही सावित्रीच्या लेकी, नाती जपूया, परीक्षेला सामोरे जाताना, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांची भूमिका असे अनेक सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व सांस्कृतिक विषयावर व्याख्याने सादर केली आहेत.

         विद्यार्थी प्रिय शिक्षिका असल्याने नेहमीच विद्यार्थ्यांचा गराड्यात असतात. स्वतःचं यूट्यूब चैनल च्या माध्यमातून 'जगु आनंदाने' (४३ व्हिडिओ अपलोड) करून विव्हर्सच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचं उत्तम कार्य केले आहे. सकाळ, सर्वधर्म, हिंदी पत्रिका क जयदीप यामध्ये विविध विषयावर लेख प्रकाशित आहेत. एक परिपूर्ण व प्रगल्भ प्राध्यापिका म्हणून त्या परिचयाच्या आहेत. जैन धर्म तत्वज्ञानाचे परिपूर्ण पणे पालन करत असून आईने दिलेल्या सक्षम विचार व संस्कारची शिदोरी ते इतरांनाही देत असतात. अत्यंत कल्पक विचार व कृतिशील कार्याच्या माध्यमातून त्या कार्यरत आहेत. नेहमीच समाजात रचनात्मक कार्य करीत राहणं यासाठी त्या कटिबद्ध आहेत.

       प्रा.अंजना चावरे या अत्यंत शांत, संयमी, विचार प्रवर्तक व बहुश्रुत व्यक्तिमत्व म्हणून त्या परिचयाच्या आहेत. समाजातील विशेष करून स्त्रियांच्या प्रश्नावर त्या अत्यंत संवेदनशील असून त्यासाठी नेहमी संघर्ष करीत असतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वैशिष्ट्य म्हणजे हर्ष उल्हासित व्यक्तिमत्व, बोलका स्वभाव, उत्तम व मधुर वाणी, सक्रियता, धार्मिकता हे दिसून येतात. कॉलेजच्या प्रत्येक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. विविध रचनात्मक उपक्रमाच्या माध्यमातून शैक्षणिक आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यार्थ्यांचे करियर, जीवनाला आकार व दिशा देण्याचा प्रयत्न त्या करीत आहेत. खरंच सावित्रीच्या लेकी- आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित झाल्याने अनेक घटकांना या पुरस्कारामुळे बळ मिळाले आहे.

     जय हिंद न्यूज नेटवर्क बोलताना त्या म्हणाल्या, माझ्या यशस्वी शैक्षणिक वाटचालीत व पुरस्काराचे खरे मानकरी माझे पती संजय चावरे , आऊ अर्थात सुनंदा चौगुले, अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे, सचिव डॉ. महावीर अक्कोळे, खजिनदार मा.पद्माकर पाटील व संस्थेचे सर्व सदस्य, कॉलेजचे प्राचार्य डॉ.सुरत मांजरे व परिवारातील सर्व सदस्य यांच्यामुळे ते शक्य झाले आहे. यापुढेही समाजातील व तळागाळातील घटकांना शैक्षणिक गुणवत्तेचा फायदा कसा होईल यासाठी नवोपक्रम सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे.

        आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित झालेबद्दल जय हिंद न्यूज नेटवर्क परिवाराच्या प्रा. अंजना चौगुले- चावरे यांचे मनस्वी अभिनंदन व पुढील शैक्षणिक वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा