![]() |
५९ वा दीक्षांत समारंभ शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा ५९ वा दीक्षांत समारंभ केंद्रीय पध्दतीने बुधवार दि. २९ मार्च, २०२३ रोजी सकाळी ११:४५ वाजता विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशिय सभागृहात संपन्न होणार आहे. सदर समारंभाचे अध्यक्षस्थान मा. श्री. रमेश बैस, मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य व मा. कुलपती शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर हे भूषविणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून मा. पद्मश्री डॉ. संजय धांडे, माजी संचालक, भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) कानपूर व सन्माननीय अतिथी म्हणून मा. नामदार श्री. चंद्रकांतदादा पाटील, मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण, महाराष्ट्र हे उपस्थित राहणार आहेत.
सदर पदवीदान समारंभासाठी एकूण ६६४५७ स्नातकां पैकी प्रत्यक्ष उपस्थित राहून १६५९४ विद्यार्थी पदवी विद्यापीठ प्रांगणात स्वीकारणार आहेत. यापैकी ७४९८ विद्यार्थी व ९०९६ विद्यार्थिनी आहेत. तसेच पोस्टाद्वारे ४९८६३ विद्यार्थी त्यापैकी २५१७४ विद्यार्थी व २४६८९ विद्यार्थिनी पदवी प्रमाणपत्र स्वीकारणार आहेत.
या दीक्षांत समारंभात १ मा.राष्ट्रपती सुवर्णपदक व मा.कुलपती सुवर्णपदक व १६ स्नातकांना पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.
समारंभातील वैशिष्ट्ये :
१)पीएच.डी. स्नातकांची एकूण संख्या ३०० असून सर्वाधिक आहे. यापैकी ४६ स्नातकांना व्यासपीठावर पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
२. विदयापीठ अधिकार मंडळाच्या निर्णयान्वये विद्यापीठाचा ५९ वा दीक्षांत समारंभ केंद्रीय पध्दतीने होत आहे.
३. दीक्षांत समारंभासाठी नोंदणी केलेल्या सर्व विदयार्थ्याचे अर्ज फक्त ऑनलाईन स्वरुपातच स्विकारण्यात आले आहेत.
४. उर्वरित पदवी प्रमाणपत्रे व पारितोषिके प्रमाणपत्रे स्नातकांना पोस्टाद्वारे पाठविण्यात येणार आहेत.
४. पदवी प्राप्त स्नातकांमध्ये विद्यार्थीनींची संख्याबळ अधिक दिसून येते.
५. शिवाजी विद्यापीठ क्रीडा विभागाने पारितोषिकांमध्ये सर्वाधिक बाजी मारली आहे.
उपरोक्त सर्व माहिती शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. डी टी शिर्के यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली. याप्रसंगी प्र.कुलगुरू प्रा.डॉ.पी.एस.पाटील, कुलसचिव प्रा. डॉ. विलास शिंदे, परीक्षा संचालक प्रा.डॉ.अजितसिंह जाधव, एन.एस.एसचे संचालक प्रा.डॉ. तानाजी चौगले, ग्रंथ महोत्सव समन्वयक डॉ.डी.बी.सुतार व मा.उपकुलसचिव उपस्थित होते.
*अधिक माहितीसाठी संपर्क कं-*
दीक्षांत विभाग - ०२३१-२६०९११३ / २६०९३०२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा