Breaking

शनिवार, १८ मार्च, २०२३

*जयसिंगपूरच्या शाहूनगर मध्ये रंगला खेळ पैठणीचा ; महिलांचा प्रचंड प्रतिसाद*


जयसिंगपुरात रंगला होम मिनिस्टर कार्यक्रम


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : वरद विनायक विरंगुळा सांस्कृतिक केंद्र शाहूनगर जयसिंगपूर गणपती मंदिर समोर महिला दिन व सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त महिलांसाठी आयोजित कार्यक्रमात  महिलांनी होम मिनिस्टर स्पर्धेत सक्रियपणे सहभाग घेतला. सदर कार्यक्रमात महिलांनी सक्रिय सहभाग नोंदवून अत्यंत जल्लोषात होम मिनिस्टर कार्यक्रम संपन्न झाला.

         या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे जयसिंगपूर शहरात प्रथमच महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन, लहान बालिके पासून सिनिअर महिलांनीइतक्या मोठ्या संख्येने व जल्लोषात  सहभाग घेतला, कार्यक्रमात महिलांची प्रचंड गर्दी, महिलांच्या कडून उत्साह पूर्ण प्रतिसाद, बक्षिसांची लयलूट, कार्यक्रमाचा अँकरिंग साठी सिने कलाकाराची व्यवस्था, उत्तम रोषनाई, प्रचंड मोठा स्टेज, उत्तम बैठक व्यवस्था व डेकोरेशन, आकर्षित करणारी स्वागत कमान, खाद्यपदार्थांचे स्टॉल, असंख्य महिलांना स्पर्धेत सहभागी होण्याचा मिळाला मान, महिला घटकांच्या कडून आयोजन करण्यात आले होते.


    कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक सौ.माधवी डोंगरे होत्या. या कार्यक्रमाचे अँकरिंग सिने कलाकार सुरज चौगुले यांनी करून कार्यक्रमात ऊर्जा आणली. होम मिनिस्टर स्पर्धेत पैठणीचा मान मनीषा खुरपे, द्वितीय स्मार्टवॉच प्रियंका माळी, तृतीय चांदीचे पैंजण आरती कदम, चौथा चांदीचा करंडा भाग्यश्री पल्ले, पाचवा सोन्याची नथ शुभांगी नाळे तसेच ७० स्पॉट बक्षीस महिलांनी पटकाविला.

    या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन प्रणाली कदम, शुभांगी जाधव, अरुणा शहा, सपना शहा, सविता मगदूम यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनात अपूर्वा देशपांडे, स्नेहल शंभूशेटे, वंदना कुलकर्णी, प्रेमला कदम यांनी घेतला.

    या कार्यक्रमासाठी माजी नगराध्यक्षा स्वरूपा पाटील यड्रावकर, डॉ. नीता माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पाटील यांनी दीप प्रज्वलन केले. दशरथ माने, महिला अध्यक्षा संपत्ती पाटील (चंदुरकर), सइदा मुजावर, अध्यक्ष मोहन राजमाने, सचिव बाबू तेरदाळे, डॉ. भगवंत कुंभार, संजय पाटील कोथळीकर, प्रमिलाताई मुरगुंडे, सचिन डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा