Breaking

मंगळवार, २८ मार्च, २०२३

*कोल्हापूर जिल्हा सुटा अध्यक्षपदी प्रा.डॉ.रसुल कोरबू ,कार्यवाह पदी प्रा.डॉ. गजानन चव्हाण व खजिनदारपदी प्रा.डॉ. विजय देसाई यांची निवड


कोल्हापूर जिल्हाध्यक्ष प्रा. आर..जी.कोरबु , कार्यवाह प्रा.गजानन चव्हाण व खजिनदार प्रा.विजय देसाई


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ अर्थात सुटाच्या द्विवार्षिक निवडणूक (२०२३-२०२५)  लोकशाही पद्धतीने व अत्यंत शांततामय वातावरणात संपन्न झाली.

      रविवार दिनांक २६ मार्च, २०२३ रोजी झालेल्या सुटा कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष व कार्यवाह, २ उपाध्यक्ष या पदासाठीचे  मतदान शांततेत पार पडले. त्यानंतर दोन तासांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणुकीचा निकाल जाहीर केला.

    हाती आलेल्या निकालानुसार कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी प्रा.डॉ.रसुल कोरबू ,कार्यवाह पदी प्रा.डॉ. गजानन चव्हाण विजयी झाले. तर उपाध्यक्षपदी प्रा.डॉ. सयाजी पाटील व प्रा.डॉ.मानाजी शिंदे हे विजयी झाले.    

          या अगोदर खजिनदारपदी प्रा.डॉ. विजय देसाई यांची बिनविरोध निवड झाली होती. तसेच उपाध्यक्षपदी प्रा. शारदा शामराव पाटील, सहकार्यवाह पदी प्रा. प्रकाश दिनकर तोरस्कर व प्रा.डॉ.एम. ए.पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.

      प्रा.डॉ.आर.जी.कोरबू सुटा संघटनेच्या माध्यमातून विविध पदावरती कार्यरत होते. शिवाजी विद्यापीठ विद्या परिषद व व्यवस्थापन परिषदेच्या माध्यमातून प्राध्यापकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला होता. सुटाचे एक अभ्यास व्यक्ती म्हणून ते परिचयाचे आहेत.

    प्रा.डॉ. गजानन चव्हाण यांनी कोल्हापूर जिल्हा सुटा खजिनदार पदाच्या माध्यमातून सुटासाठी कार्य केले आहे. विविध आंदोलन व मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी सुटा संघटनेसाठी सक्षम काम केले आहे.

    प्रा. डॉ. विजय देसाई अर्थशास्त्र अभ्यास मंडळाच्या माजी सदस्य म्हणून आपले योगदान दिलं आहे. सुटा सदस्य प्राध्यापक म्हणून त्याचं कार्य वाखाण्याजोगे आहे.

प्रा.डॉ. सयाजी पाटील व प्रा. मानाजी शिंदे

     प्रा.डॉ. सयाजी पाटील यांनी सुटा संघटनेच्या ध्येयधोरणाशी प्रामाणिकपणे नाळ जोडून सुटासाठी खूप कार्य केले आहे. सुटाच्या प्रत्येक आंदोलनात ते सक्रिय व अग्रभागी  असतात.

     जय हिंद न्यूज नेटवर्कशी बोलताना डॉ. आर.जी.कोरबू म्हणाले, सुटा संघटनेचा मुख्य हेतू व कार्यपद्धतीनुसार सुटा संघटनेच्या सक्षमीकरणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर प्राध्यापकांच्या न्याय व हक्कासाठी रस्त्यावरची लढाई सुरू राहणार असल्याचेही ते म्हणाले.

     सर्व विजयी उमेदवारांचे मनस्वी अभिनंदन व पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा