Breaking

शुक्रवार, २१ एप्रिल, २०२३

*डॉ.आंबेडकर हे वैश्विक समाज व्यवस्थेचे मानवतावादी नेता : प्रा.डॉ. नितीश सावंत यांचे प्रतिपादन*


मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. नितीश सावंत, प्रा.डॉ.एस.बी.बनसोडे,प्रा.डॉ. टी.जी.घाटगे व प्रा.सुरज चौगुले

*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपुरच्या इतिहास विभाग व IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानमालेत डॉ.आंबेडकर हे वैश्विक समाज व्यवस्थेचे मानवतावादी नेता होते असे मत प्रा.डॉ. नितीश सावंत यांनी प्रतिपादन केले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.एस.बी.बनसोडे व प्रमुख उपस्थितीमध्ये प्रा.डॉ. टी.जी.घाटगे होते.

       सदरचा कार्यक्रम शनिवार दि. १५ एप्रिल २०२३ रोजी आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून मराठी विभागप्रमुख प्रो. डॉ. एन. पी.सावंत उपस्थित होते.

   या प्रबोधन पर व्याख्यानामध्ये डॉ. सावंत यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील वेगवेगळ्या पैलूंचे विवेचन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मापासून त्यांचे भारतातील व परदेशातील शिक्षण, त्यांचे बडोदा संस्थानातील कार्य तसेच त्यांनी विलायतेमधून बॅरिस्टर चे शिक्षण पूर्ण करून भारतामध्ये परत आल्यानंतर त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या सामाजिक कार्यांचे अभ्यासपूर्ण विवेचन केले. तसेच बाबासाहेबांच्या जीवनातील माणगाव परिषद, महाड सत्याग्रह, काळाराम मंदिर प्रवेश व बौद्ध धर्माचा स्वीकार या महत्त्वपूर्ण घटनांचा सांगोपांग पद्धतीने उहापोह केला. 

        IQAC प्रमुख प्रो. डॉ. टी. जी. घाटगे मनोगतात म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी रचनात्मक व सृजनात्मक काम कशा पद्धतीने केले याचे वास्तव दाखले देऊन स्पष्ट केले. 

      अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ.बनसोडे म्हणाले, विद्यार्थ्यांनी महापुरुषांची चरित्र वाचावी तसेच त्यांच्या विचारांचा वसा आणि वारसा आपण जपला पाहिजे असे आवाहन केले. 

   सदर कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक इतिहास विभागाचे प्रा. सुरज चौगुले यांनी केले. प्रास्ताविकात ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना डॉ. आंबेडकर यांच्या जीवनकार्याची माहिती व्हावी, या उद्देशाने कार्यक्रम आयोजनाचे हेतू आहे.

   या कार्यक्रमाचे आभार प्रा. परशुराम माने यांनी मानले. कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन बी.ए. भाग दोन मधील विद्यार्थिनी कु. कीर्ती नलवडे यांनी केले. 

   सदरचा कार्यक्रम कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरित्या संपन्न झाला.

     या व्याख्यानाचेया कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील कला व वाणिज्य विभागातील सर्व प्राध्यापक आणि 173 विद्यार्थी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा