Breaking

सोमवार, १० एप्रिल, २०२३

संविधान समजून सांगता येत नसेल तर किमान त्याबद्दल गैरसमज तरी पसरू नये. अमोल पाटील, संविधान संवादक फुले शाहू आंबेडकर विचारमंच शिरोळ येथे संविधान जागर कार्यक्रम संपन्न

 

संविधान संवादक - श्री अमोल पाटील 

✍🏼पत्रकार मालोजीराव माने, कार्यकारी संपादक 

शिरोळ - संविधानाचा अभ्यास करून ते नागरिकांना सोप्या भाषेत सांगता येत नसेल तर किंबुहूना संविधानाबद्दल गैरसमज तरी पसरू नये. असे मत संविधान संवादक श्री अमोल पाटील यांनी फुले शाहू आंबेडकर विचारमंच शिरोळ यांच्यातर्फे आयोजित संविधानाचा जागर या कार्यक्रमात मांडले. संविधान सोप्या भाषेत समजून सांगताना, जे संविधान आपण रोज जगतोय, ज्या संविधानामुळे सर्व कारभार सुरळीत चालला आहे ते संविधान समजण्याचा व इतरांना देखील समजून सांगण्याचे कर्तव्यही आपण पार पाडले पाहिजे, असे उद्बोधनही त्यांनी केले.



      फुले शाहू आंबेडकर विचारमंच शिरोळ यांनी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी सलग १८ तास अभ्यास व संविधानाचा जागर हा उपक्रम राबविला होता.

संविधान पोस्टर प्रदर्शन 


     यावेळी लोकराजा शाहू संविधान संवाद केंद्र महाराष्ट्र चे साथीदार स्नेहल माळी, दामोदर कोळी तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री विजय शिरोळकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नंदकिशोर नार्वेकर, राजेंद्र प्रधान, सचेतन बनसोडे, निलेश शिरोळकर, चिदानंद कांबळे, खंडेराव हेरवाडे, राजेंद्र दाभाडे, प्रकाश कांबळे, प्रशांत माने, दत्तात्रय खोराटे यांची उपस्थिती होती. तसेच विविध वयोगटातील ९० वाचक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा