![]() |
व्याख्याते प्रा.डॉ.अमर कांबळे |
✍🏼 पत्रकार मालोजीराव माने, कार्यकारी संपादक
सांगली : शिव,शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार आजही जिवंत आहेत कारण ते द्वेषहीन, जातीविरहित आणि समाजहिताचे होते. असे मत व्याख्याते प्रा.डॉ. अमर कांबळे यांनी मांडले. श्रीमती पुतळाबेन शाह कॉलेज ऑफ एज्युकेशन, सांगली येथे महात्मा ज्योतिराव फुले व डॉ बी.आर.आंबेडकर यांची संयुक्तरित्या जयंती साजरी करण्यात आली होती, यावेळी ते मार्गदर्शन करत होते. यावेळी संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा देखील घेण्यात आली.
यावेळी व्याख्याते अमर कांबळे यांनी विद्यार्थ्यांना फुले आंबेडकर यांची विचारधारा व त्यांचा संघर्ष सांगत विविध अंगाने मार्गदर्शन केले.
बी.एड च्या विद्यार्थ्यांनी भावी शिक्षक म्हणून काम करताना खूप समृध्द बनले पाहिजे, कारण तुमच्या हातात शेकडो पिढ्या घडणार आहेत. द्वेषमुक्त दोषमुक्त समाज निर्माण करायचा असेल तर फक्त शिक्षकच करू शकतो, कारण व्यक्तीला शिल, चारित्र्य, सदाचार, वानी, प्रज्ञा, प्रेम,समता, मानवता याकडे नेणारं शिक्षण आहे. असा संदेश विद्यार्थ्यांना दिला
तसेच महामानवांचा सन्मान करायचा असेल तर त्यांचे विचार जोपासले पाहिजेत असे म्हणत गाडीच्या पुंगळ्या काढून फिरणाऱ्या अनुयायांचा खरपूस समाचार देखील घेतला.
![]() |
पाहुण्यांचे स्वागत करताना ज्योती कुल मार्गदर्शक प्रा.डॉ.सुशील कुमार |
या कार्यक्रमाचे आयोजन ज्योती कुलामार्फत करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी मा. प्राचार्य डॉ. बी.पी. मरजे सर होते. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ प्रा.डॉ.सुशील कुमार, प्रा.डॉ.युवराज पवार, प्रा.डॉ.नवनाथ इंदलकर, ग्रंथपाल श्रीमती संध्या यादव, गायत्री जाधव, दयानंद बोंदर, सौ.वैशाली गायकवाड, मुक्ता पाटील तसेच बीएड प्रथम व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी उपस्थित होते.
श्रीमती काजल पाटील यांनी पाहुण्यांची ओळख व प्रास्ताविक केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती माया कडाळे, मृणाली मुंजाप्पा यांनी तर आभार रत्नप्रभा तलवार यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा