Breaking

बुधवार, १९ एप्रिल, २०२३

*रस्ते अपघातात मरण्यापेक्षा देश सेवेसाठी शहीद झालेले कधीही चांगले : कर्नल पी. सी. पवार यांचे प्रतिपादन*


करिअर मार्गदर्शन करताना कर्नल पी. सी. पवार,सोबत रेश्मा जाधव,अशोक शिरगुप्पे,प्रा. अप्पासाहेब भगाटे व डॉ.एन.पी.सावंत


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : अनेकांत एज्युकेशन सोसायटी बारामतीचे जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर येथे ज्युनिअर कॉलेज विभागामार्फत इयत्ता १० वी व १२ वी विद्यार्थ्यांसाठी  ‘करिअर मार्गदर्शन' कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व वक्ते कर्नल पी. सी. पवार होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सदस्य मा. अशोक शिरगुप्पे व प्रा. अप्पासाहेब भगाटे,होते.

      कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मा. कर्नल पी. सी. पवार मार्गदर्शन करताना म्हणाले, विद्यार्थ्यांना मानवतावादी दृष्टिकोन जोपासण्याचा असेल आणि परिपूर्ण व फलदायी जीवन घडवायचे असेल तर एन. डी. ए. हा सर्वोत्तम पर्याय आहे.

     आपले आयुष्य निरोगी, सदृढ व सुरक्षितरित्या पार पाडायचे असल्यास एन. डी. ए. हा एक उत्तम मार्ग आहे. आजच्या काळात देशभक्ती जागृत करणे, सुजाण नागरिक, समाजसेवक, धर्मनिरपेक्ष, स्वत:ला सिध्द करण्याची क्षमता, राजकीय दबावाचा अभाव आणि समाजामध्ये मिळणारी प्रतिष्ठा  व  जीवन सार्थक घडविण्यासाठी एन.डी.ए.सर्वोत्तम पर्याय आहे.तसेच रस्ते  अपघातात मरण्यापेक्षा देशासाठी शहिद झालेले कधीही चांगले असे प्रतिपादन कर्नल पवार यांनी केले.

       अध्यक्षीय स्थानावरून बोलताना संस्थेचे सदस्य मा. श्री. अशोक शिरगुप्पे म्हणाले, एन. डी. ए. मधील नोकरीच्या संधी म्हणजे अलीबाबाची गुहाच आहे त्याचा लाभ प्रत्येक विद्यार्थ्याने परिस्थिती पाहून घ्यावा. 

   या कार्यशाळेची सुरुवात रोपटयाला जलार्पण करुन करण्यात आले. या कार्यशाळेचे स्वागत व प्रास्ताविक प्रा.डॉ. एन. पी. सावंत यांनी केले. त्यावेळी कॉलेजच्या यशाचा उत्तुंग आलेख आपल्या ओघवत्या शैलीत केले. पाहुण्यांची ओळख प्रा. सुनील चौगुले यांनी व आभार प्रदर्शन पर्यवेक्षक डॉ.महावीर बुरसे यांनी मानले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा.सौ. व्ही. एस. पाटील यांनी केले. 

   या कार्यशाळेसाठी संस्थेचे सदस्य मा.प्रा.आप्पासाहेब भगाटे व मिलेटरी हॉस्पीटल कोल्हापूर येथील रेश्मा जाधव उपस्थित होत्या. या कार्यशाळेसाठी विद्यार्थी, पालक, सर्व अध्यापक तसेच प्रशासकीय सेवक मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यशाळेसाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. 

      सदरची कार्यशाळा प्राचार्य डॉ.सुरत.मांजरे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे संपन्न झाली.

       उपस्थित पालक व विद्यार्थी यांचेकडून या कार्यशाळेबाबत समाधान व्यक्त करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा