![]() |
कॉलेज परिसरातून संकलित केलेले प्लास्टिक सोबत प्राचार्य डॉ. सुरत मांजरे व एनएसएस विद्यार्थी |
*कुणाल रजपूत : विशेष प्रतिनिधी*
जयसिंगपूर : जयसिंगपूर कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी कॉलेज परिसरातील प्लास्टिकचे संकलन करून डॉ.आंबेडकर यांना जयंतीनिमित्त रचनात्मक कृतिशील कामातून अभिवादन करण्यात आले.
सुरुवातीस प्राचार्य डॉ.सुरत मांजरे यांनी ही रचनात्मक संकल्पना सांगून प्लास्टिक संकलन करून बाबासाहेबांना अभिवादन करण्यास सांगितले. प्राचार्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार जयसिंगपूर कॉलेज राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने काही निवडक स्वयंसेवक विद्यार्थ्यांच्या माध्यमातून कॉलेज परिसरातून जवळपास २० किलोग्रॅम वजनाचे प्लास्टिक व प्लास्टिक सदृश्य वस्तू यांचे संकलन करण्यात आले.
प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रभाकर माने व कार्यक्रम अधिकारी डॉ. खंडेराव तसेच एन.एस. एस.विद्यार्थी प्रतिनिधी भोलू शर्मा याच्या नेतृत्वाखाली प्लास्टिक गोळा करण्याचं काम यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले. तदनंतर संकलित झालेले प्लास्टिक जयसिंगपूर नगरपालिकेच्या स्वच्छता विभागास सुपूर्त करण्यात आले.
यावेळी श्रेया संकपाळ, सृष्टी नलवडे, प्रथमेश कोळी, मयुरी एडके,सोनिया चव्हाण, समृद्धी एलाज, संस्कृती मगदूम, ऋतुजा चव्हाण, प्रज्ञा दीक्षित, आरती बिरंजे, ऐश्वर्या जाधव व अन्य स्वयंसेवक विद्यार्थी सहभागी होते.
डॉ.आंबेडकर जयंतीचे निमित्त साधून केलेल्या या अनोख्या व रचनात्मक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा