Breaking

गुरुवार, २० एप्रिल, २०२३

*वास्तव परिस्थितीची जाणीव व आत्मप्रेरणेतून यशाचे शिखर गाठता येते : प्रमोद चौगुले*


मार्गदर्शन करताना मा.प्रमोद चौगुले,सोबत डॉ.सुभाष अडदंडे,डॉ. महावीर अक्कोळे,शैलेश चौगुले व डॉ.सुरत मांजरे

प्रा.डॉ.प्रभाकर माने : मुख्य संपादक


जयसिंगपूर : बुधवार दि. १९/०४/२०२३ रोजी शिवार सामाजिक विकास व संशोधन सेवा संस्था आणि जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर संचलित एकलव्य करिअर अकॅडमीच्या वतीने कार्यशाळा आयोजित केली होती.या कार्यक्रमात प्रमोद चौगुले यांनी 'वास्तव परिस्थितीची जाणीव व आत्मप्रेरणेतून यशाच्या शेखर गाठता येऊ शकते' असे प्रतिपादन केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे होते. याप्रसंगी डॉ. महावीर अक्कोळे,सौ. प्रेरणा चौगुले, केंद्र संचालक मा. नगरसेवक शैलेश चौगुले व प्राचार्य डॉ. सुरत मांजरे प्रमुख उपस्थित होते.

      या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व वक्ते मा. प्रमोद चौगुले हे.M.P.S.C.च्या परीक्षेत राज्यात सलग दोनवेळा (सन २०२१ व २०२२) प्रथम स्थानी विराजमान झालेबद्दल महाविद्यालयाच्या वतीने डॉ. सुभाष अडदंडे  यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

     एकलव्य करिअर अकॅडमी च्या वतीने 'स्पर्धा परीक्षा संपूर्ण मार्गदर्शन व  पूर्व परीक्षेची व्युहरचना' या विषयावर मार्गदर्शन करताना प्रमोद चौगुले म्हणाले, कष्टकरी समाजातील 70 टक्के मुले ही स्पर्धा परीक्षेत यशस्वी होत असतात. यासाठी स्वतःचं उदाहरण त्यांनी दिले. नवोदयच्या प्रवेशापासून ते यशस्वी होण्यापर्यंत सातत्याने अभ्यासात स्वतःला झोकून दिल्याने हे यश संपादन करता आले. याप्रसंगी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी यशाची गुरुकिल्लीचे मार्ग सांगितले.

 १.आंतर ऊर्जेच्या माध्यमातून कार्यरत राहणे.

२ उत्तम नियोजन व प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे.

३.भावनिकतेचा बळी न पडता.निरंतर कार्यप्रवण राहणे.

४. Attitudy बाळगू नये.

५. बुद्धीमत्तेवर विश्वास ठेवा व स्वयंअध्यनाला प्रारंभ करा.

६  स्वप्नाळू जगू नका आणि सत्याचा स्वीकार करून पुढे जा

७. न्यूनगंड बाळगू नका.

८. इंग्रजी विषयाचे भय बाळगू नये.

९. जीवनात चढ-उतार होत असतात. त्यामुळे खचून जाऊ नका.

१०. स्वप्नाळू न जगता सत्याचा स्वीकार करून मार्गक्रमण करणे गरजेचे आहे.

११. अपयश आल्यानंतर नाराज न होता आत्मपरीक्षण करण्याची गरज असते.

१२. स्वतःवर विश्वास ठेवून यश हीच पहिली पायरी असू शकते असा विचार करून अभ्यासाला सामोरे जा.

१३. वर्तमान तुमचा असून भविष्याविषयी जास्त काळजी करू नये.

१४. यश हे व्यक्तीपरत्वे असून यासाठी दुसऱ्याशी तुलना करू नका.

१५. नेहमी शांत रहा व संयम बाळगा.

१६. वक्तशीर राहून योग्य मार्गदर्शकाच्या सहवासात रहा.

१७. यश संपादनासाठी स्वतःचे नोट्स बनवा.

१८.स्पर्धा परीक्षेला समोर जात असताना व्यावहारिक रहा.

     मा.प्रमोद चौगुले मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले, अत्यंत कठीण परिस्थितीत यश संपादन करता येते. मला मिळालेले यश हे सात वर्षाच्या प्रदीर्घकाळ व अभ्यासपूर्ण श्रमानंतर मिळाले आहे.

   सरते शेवटी ते म्हणाले, कामयाबी मिलना इतना आसान नही है ! कभी कभी नसीब का सहारा भी होता है!

      सौ.प्रेरणा चौगुले बोलताना म्हणाल्या, यश मिळवण्यासाठी कष्ट प्रद अभ्यास व प्रवास करावा लागतो.जर लवकर यश प्राप्त झाले नसेल तर स्वकीय व इतर घटकाकडून नकारात्मकतेला सामोरे जावे लागते. अशावेळी निर्णयावर ठाम राहून या सर्वावर मात करीत मा.प्रमोद चौगुले यांनी राज्यात दोन वेळा प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. याप्रसंगी महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाल्याबद्दल कु.सदामते यांचा सत्कार करण्यात आला.

         महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरत मांजरे आभार व्यक्त करताना म्हणाले, प्रत्येकाच्या आयुष्यात दिशादर्शक व उत्तम मार्गदर्शक गुरूची आवश्यकता असते. याशिवाय यश संपादन करता येत नाही. यासाठी एकलव्य करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा केंद्र एक उत्तम  पर्याय आहे.

     सदरचा कार्यक्रम माजी खासदार राजू शेट्टी,संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे,सचिव डॉ.महावीर अक्कोळे यांच्या मार्गदर्शनाखाली व कॉलेजचे प्राचार्य डॉ.सुरत मांजरे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजक अमोल चौगुले होते.

   या कार्यक्रमास स्पर्धा परीक्षा अभ्यास करणारे शेकडो विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं निराकरण प्रमोद चौगुले यांनी केले. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. अमोल चौगुले यांनी व कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन शिल्पा चौगुले यांनी केले.

   एकलव्य करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिक संपर्कासाठी अमोल चौगुले यांच्याशी संपर्क करावा.

  मा. श्री. अमोल चौगुले

प्रशासक एकलव्य अॅकॅडमी

मो. ७०२०२२५१८०, ८८८८३०१८९१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा