![]() |
संग्रहित छायाचित्र |
*प्रविणकुमार माने : उपसंपादक*
गडहिंग्लज : तालुक्यातील एका गावातून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध येथील पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी सांगितले, की.गुरूवार दिनांक ५ रोजी सायंकाळी ६.०० च्या सुमारास संबंधित मुलगी पदयात्रा पाहण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिला अज्ञाताने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी पोलिसांत दिली आहे. अंगाने सडपातळ, पाच फूट उंची, निम गोरी, चेहरा गोल, नाक सरळ, कपाळावर गोंदन व पिवळसर रंगाची पंजाबी ड्रेस घातलेली मुलगी कोणाला आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन तपासी अधिकारी उपनिरीक्षक विक्रम वडणे यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा