Breaking

बुधवार, २६ एप्रिल, २०२३

*कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी संजय भोसले, उपाध्यक्षपदी प्रा.गंगाराम सातपुते, सचिव पदी प्रा.डॉ. प्रभाकर माने व शिरोळ तालुका अध्यक्षपदी रोहित जाधव यांची निवड*

 

पदाधिकारी निवडीचे पत्र प्रदान करताना पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वैजने साहेब व उपस्थित सर्व पदाधिकारी पत्रकार बंधू


*प्रा.डॉ. प्रभाकर माने  : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने कोल्हापूर जिल्हा पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष राजू दळवी व राष्ट्रीय सचिव गोविंद मोरे यांचेकडून निवडीचे पत्र प्राप्त झाले आहे.सदरच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे पत्र  डी.वाय.एस.पी. जयसिंगपूर विभागीय मा. रामेश्वर वैजने साहेब यांच्या हस्ते पोलीस उपअधिक्षक कार्यालयात वितरित करण्यात आले.

       केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी संजय भोसले,(संपादक, देधडक बेधडक न्यूज चैनल) उपाध्यक्षपदी प्रा.गंगाराम सातपुते(कार्यकारी संपादक, देधडक बेधडक न्यूज चैनल), सचिव पदी प्रा.डॉ. प्रभाकर माने (संपादक,जय हिंद न्यूज नेटवर्क) व शिरोळ तालुका अध्यक्षपदी रोहित जाधव (संपादक,महाराष्ट्र 24 तास) यांची निवड करण्यात आली आहे.

     यावेळी जिल्हाध्यक्ष संजय भोसले म्हणाले,संस्थापक अध्यक्ष राजू दळवी व राष्ट्रीय सचिव गोविंद मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय लोकशाही पत्रकार संघटना राष्ट्रीय व राज्य पातळीवर कार्यरत असून पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी झटणारी एक सक्षम संघटना आहे. या संघटनेच्या माध्यमातून पत्रकार बंधू-भगिनींचे प्रश्न ऐरणीवर मांडण्याचा काम या संघटनेच्या माध्यमातून केले जात आहे.

      याप्रसंगी पोलीस उप-अधीक्षक मा. रामेश्वर वैजने साहेब म्हणाले, या देशात पत्रकारांच्या माध्यमातून लोकशाही व संविधान टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला जात असतो. अर्थात भारतीय लोकशाहीचा चौथा बळकट स्तंभ म्हणून पाहिले जाते. पत्रकार बंधू सर्वसामान्यांचे प्रश्न विविध प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून समाजासमोर आणून त्याला वाचा फोडण्याचे काम करीत असतात. त्यांच्या या कृतीमुळे देशातील प्रत्येक घटकाला आपलं जीवन सुखकर होण्याचा मार्ग मोकळा होतो. देशासाठी व समाजासाठी झटणाऱ्या या पत्रकारांचे जीवन प्रवास संघर्षमय असतो. अशावेळी या पत्रकार बंधूंचे प्रश्न मार्गी लावणे हे देखील तितकाच महत्वाचे विषय असतो. यासाठी देश पातळीवर विविध संघटना कार्यरत आहेत. मात्र केंद्रीय लोकशाही पत्रकार संघटनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक संघटनात्मक बळ या माध्यमातून मिळाले आहे.

     मा. रामेश्वर वैजने साहेब पुढे म्हणाले, या संघटनेकडून पत्रकारांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम काम होईल अशी अपेक्षा आहे. त्यांनी निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा प्रदान केल्या.

        या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. गंगाराम सातपुते यांनी केले.तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रोहित जाधव यांनी केले.

        या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. प्रभाकर माने यांनी केले. यावेळी असंख्य घटक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा