*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कोल्हापूर : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार संशोधक विद्यार्थांना कायम नावनोंदणी पत्र देण्यापूर्वी त्यांनी Research and Publication Ethics (RPE) हि परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे . त्याकरिता शैक्षणिक वर्ष २०२०-२१, २०२१-२२ व २०२२-२३ मधील एप्रिल-२०२३ मध्ये होणाऱ्या परीक्षेकरिता - Research and Publication Ethics (RPE) ची परीक्षा दि. २७ एप्रिल २०२३ रोजी दुपारी १२-०० ते १-०० या वेळेत विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र इमारत, तंत्रशास्त्र विभाग, ग्रंथालय अभ्यास केंद्र आणि रसायनशास्त्र विभाग या चार केंद्रामध्ये आयोजित केली होती.
सदर परीक्षेसाठी एकूण १३१५ विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरलेला होता मात्र १२२८ विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थित व ८७ विद्यार्थी अनुपस्थित होते. सदर परीक्षेसाठी ९३.३८ टक्के विद्यार्थी उपस्थित होते. अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा.डॉ. अजितसिंह जाधव यांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा