![]() |
उपमहाराष्ट्र केसरी किताब विजेते महिला पैलवान कु. अमृता पुजारी |
*सौ.गीता माने : सहसंपादक*
जयसिंगपूर : शिरोळ येथील महिला पैलवान कु. अमृता शशिकांत पुजारी हिला उपमहाराष्ट्र केसरी किताब नुकताच बहाल करण्यात आला आहे. अखिल भारतीय कुस्ती महासंघ आणि अस्थायी समिती महाराष्ट्र राज्य यांच्या मान्यतेने पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
या स्पर्धेत शिरोळची सुकन्या पैलवान कु.अमृता पुजारी सहभागी होत्या. या कुस्ती स्पर्धेत तिला उपमहाराष्ट्र केसरी किताब देऊन गौरवण्यात आले तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
कु.अमृता पुजारी हिने हे यश मिळवले असले तरी या स्पर्धेमध्ये आपल्यावर दुजाभाव करण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे. कु.अमृता पुजारी एक सामान्य कुटुंबातील असून वडील एका कारखान्यात नोकरी करीत आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना ही तिने हे यश मिळविले आहे. तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा