![]() |
जयसिंगपूर कॉलेजमध्ये महाराष्ट्र व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करताना प्राचार्य डॉ. सुरत मांजरे व प्राध्यापक वर्ग व प्रशासकीय सेवक |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : अनेकांत एज्युकेशन सोसायटी बारामतीच्या जयसिंगपूर कॉलेज,जयसिंगपूर मध्ये आज १ मे रोजी महाराष्ट्र व कामगार दिन साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत गाण्यात आले.
संपूर्ण राज्यात १ मे हा दिवस महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवस म्हणूनही साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांनी उपस्थितांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या मनस्वी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले,स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्याच्यानंतर काही काळ गुजरात आणि महाराष्ट्र हे दोन्ही राज्य मुंबई प्रांताचे भाग होते. त्यावेळी या मुंबई प्रांतात मराठी आणि गुजराती भाषकांची संख्या अधिक होती. दोन्ही भाषिकांकडून स्वतंत्र राज्याची मागणी केली जात होती. त्यामुळे भाषावार प्रांतरचनेमुळे गुजरात आणि महाराष्ट्र या दोन वेगळ्या राज्याची घोषणा करण्यात आली. १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला. त्यामुळे १ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो.
प्राचार्य डॉ.मांजरे पुढे म्हणाले, देशात महाराष्ट्र राज्य हे सर्व संपन्न असून आर्थिक, औद्योगिक, कृषी,शैक्षणिक, कला-सांस्कृतिक, क्रिडा,सामाजिक व सामाजिक क्षेत्रात अग्रणीय आहे. महाराष्ट्रातील थोर समाज सुधारक व संतांनी दिलेले योगदान देशाच्या विकासाबरोबर महाराष्ट्र राज्याच्या सर्वांगीण विकासाची महत्वाची भूमिका पार पाडली आहे.आजच्या स्पर्धात्मक युगात महाराष्ट्र राज्य देशपातळीवर आघाडीचे व नेतृत्व करणारे राज्य आहे. देश विकासाच्या प्रत्येक टप्प्यात महाराष्ट्राने घेतलेली नेतृत्व विकासाची भूमिका महत्त्वाची आहे.
प्राचार्य डॉ.मांजरे पुढे म्हणाले, छ. शिवाजी महाराज, छ.शाहू राजे, महात्मा फुले,डॉ.आंबेडकर व अन्य थोर महापुरुषांच्या अगणित त्यागाने व मानवतावादी मूल्यांच्या योगदानामुळे महाराष्ट्र राज्य पुरोगामी विचारांचे राज्य बनले आहे.आज महाराष्ट्र राज्य देशात सर्व क्षेत्रात आघाडीवर व देश विकासाचे रोल मॉडेल म्हणून दिशादर्शक ठरले आहे.
याप्रसंगी कॉलेजचे उपप्राचार्य प्रा.डॉ.एन.एल.कदम, प्रा.डॉ.एस.बी. बनसोडे , प्रा.भारत आलदर ,पर्यवेक्षक प्रा.डॉ.महावीर बुरसे, कार्यालयीन अधीक्षक संजीव मगदूम, संजय चावरे, प्राध्यापकवृंद व प्रशासकीय सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नेटके नियोजन एन.सी.सी. ऑफिसर प्रा. सुशांत पाटील यांनी केले.तर या कार्यक्रमाचं उत्तम सूत्रसंचालन प्रा. बाळगोंडा पाटील यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा