![]() |
पाणपोईचे उद्घाटन करताना डॉ.महावीर अक्कोळे, मा.अशोक शिरगुप्पे, प्राचार्य डॉ. सुरत मांजरे,डॉ.एस.बी. बनसोडे व एन.एस.एस. स्वयंसेवक विद्यार्थी |
*कुणाल रजपूत : विशेष प्रतिनिधी*
जयसिंगपूर : जयसिंगपूर कॉलेज राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने कॉलेज कॅम्पस मध्ये पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी स्थानिक व्यवस्थापन समितीचे सचिव डॉ. महावीर अक्कोळे,ज्येष्ठ सदस्य मा.अशोक शिरगुप्पे व प्राचार्य डॉ. सुरत मांजरे उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने नांदणी रोड कॉलेज गेट व शिरोळ रोड गेटच्या मध्यभागी असणाऱ्या चौकाजवळ (वॉचमन गेट)येथे येणाऱ्या विद्यार्थी-पालक , वाटसरू व खेळाडू यांची गर्दी या परिसरात अधिक असते.
मुळात कॉलेजचा कॅम्पस २५ एकरच्या विस्तीर्ण परिसरात पसरलेला आहे. कॉलेजच्या माध्यमातून कॉलेज साठी मोठा RO प्लांट असून या माध्यमातून शुद्ध व मुबलक पाण्याची सोय उपलब्ध आहे. मात्र परिसराचा विचार करता उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची सोय जवळ व्हावी या हेतूने पाणपोईची सुरू करण्यात आली आहे.
जयसिंगपूर चे प्रसिद्ध धन्वंतरी व सामाजिक चळवळीचे अग्रणीय नेते डॉ. महावीर अक्कोळे व अशोक शिरगुप्पे यांचे हस्ते पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी ते डॉ. अक्कोळे म्हणाले, सध्या प्रचंड उन्हाळा असून तहानलेल्या व्यक्तीना योग्य वेळी पाणी न मिळाल्याने उष्माघाताने काही लोक दगावत आहेत. नुकताच कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी मध्ये उष्माघाताने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर जयसिंगपूर कॉलेज राष्ट्रीय सेवा योजनेने मानवतेच्या भावनेने तहानलेल्या व्यक्तीला पाण्याची सोय त्वरित व्हावी यासाठी पाणपोईचा सुरू केलेला उपक्रम कौतुकास्पद आहे.
याप्रसंगी सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ नेते अशोक शिरगुप्पे म्हणाले, तहानलेल्या व्यक्तीची तहान भागवण्यासाठी थंड पाण्याची व्यवस्था करणे हे मानवतावादी उदारमतवादी संस्कृतीचे महत्वाचे लक्षण आहे. अशावेळी एन.एस.एस च्या वतीने अशा हा उपक्रम राबविणे हे एक लोकसेवेचे कार्य आहे. असेच उपक्रम या विभागाच्या माध्यमातून सातत्याने राबवले जाण्याविषयी अपेक्षा व्यक्त केली.
या उद्घाटन प्रसंगी उपप्राचार्य डॉ.एस.बी.बनसोडे,डॉ.सौ.एस.जी. संसुद्धी, प्रा.जीवन आवळे,कार्यक्रम अधिकारी डॉ.प्रभाकर माने, डॉ.खंडेराव खळदकर, एन.एस.एस. प्रतिनिधी भोलू शर्मा,प्रथमेश कोळी,राहुल बिदरे व एन.एस.एसचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा