Breaking

शनिवार, ८ एप्रिल, २०२३

*शिवाजी विद्यापीठात ''फुले-शाहू-आंबेडकर'' सप्ताहाचे आयोजन*


फुले-शाहू-आंबेडकर सप्ताह


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


कोल्हापूर :   शिवाजी विद्यापीठात फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.दि. १० एप्रिल २०२३ रोजी या सप्ताहाचे उद्घाटन होणार असून दि.१० ते १५ एप्रिल २०२३ या कालावधीत फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहाचे आयोजन केले आहे.

     त्यामध्ये दोन परिसंवाद, वक्तृत्व स्पर्धा, कवीसंम्मेलन, व्याख्यान आणि आजी, माजी विद्यार्थी मेळावा अशा भरगच्च उपक्रमांचा समावेश आहे. 

     या सप्ताहाचे उद्धाटन प्रमुख पाहुणे पुणे येथील वसंतदादा इन्स्टिटयुटचे संचालक शिवाजीराव देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. मा. कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. तर मा. प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पी.एस.पाटील व प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. 

      सप्ताहाच्या पहिल्या दिवशी सोमवार  दि.१०/४/२०२३ रोजी पंजाबराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त ''भारतातील शेतीच्या समस्या'' या विषयावर परिसंवाद होणार असूून त्यासाठी श्री. शिवाजीराव देशमुख, प्रा.डॉ.एस.टी. बागलकोटी प्रा.डॉ.पी.एस.कांबळे हे आपले विचार मांडणार आहेत. 

      सप्ताहाच्या दुस-या दिवशी मंगळवार दि.११/४/२०२३ रोजी महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंती निमित्ताने ''फुले आंबेडकरांची भारतविषयक संकल्पना या विषयावर परिसंवाद होणार असून त्यासाठी प्रा. डॉ. भारती पाटील, डॉ. अरूण शिंदे, श्री.टेकचंद सोनवणे, पुणे  हे आपले विचार मांडणार आहेत. 

  तिस-या दिवशी बुधवारी दि. १२ एप्रिल २०२३ रोजी दुपारी ४ ते ६ या वेळेत सामाजिक विषयावरील कवितांचे कवीसंम्मेलन आयोजित केले असून त्यासाठी रफिक सूरज, प्रसाद कुलकर्णी, प्रा. डॉ. रविंद्र श्रावस्ती, प्रा.डॉ. श्यामसुंदर मिरजकर, अविनाश भाले, डॉ. सचिन कांबळे हे कवी आपल्या कविता सादर करणार आहेत. 

  चौथ्या दिवशी गुरूवार दि. १३ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १०.३० वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्र येथे वक्तृत्व स्पर्धा होणार असून पदवी व पदव्युत्तर अशा दोन गटात ही स्पर्धा होणार असून त्याचे

 १) फुले शाहू आंबेडकर विचार त्रिसुत्री २) आरक्षण - प्रतिनिधीत्व : फुले-शाहू-आंबेडकर दृष्टीकोन 

३) ज्ञानाचे प्रतिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 ४) फुले-शाहू-आंबेडकर आणि स्त्री-पुरूष समानता 

५) फुले-शाहू-आंबेडकर : आजची गरज हे विषय असणार आहेत. 


   शुक्रवार दि.१४ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ९.३० वा. रा. शाहू सभागृह सिनेट हॉल येथे डॉ. रमेश कांबळे, मुंबई विद्यापीठ, मुंबई यांचे ''डॉ. बाबासाहेब आबेडकर आणि सार्वजनिक चिकित्सक अवकाश'' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात येणार आहे.  


   शनिवार दि.१५ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १०.३० वा. मानव्यशास्त्र सभागृहामध्ये आजी-माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात येणार आहे.  

     तरी जास्तीत जास्त घटकांनी यामध्ये सहभागी होऊन फुले-शाहू- आंबेडकरया सप्ताहाचा लाभार्थी बनावे असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा