Breaking

बुधवार, १७ मे, २०२३

*मिरजेतील भीषण अपघातात ६ जण ठार ; विटाने भरलेली ट्रॉली व बोलेरो यांच्यात समोरासमोर झाली धडक*


मिरज येथे भीषण अपघात


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


मिरज : दोन दिवसापूर्वीच नव्याने सुरू झालेल्या रत्नागिरी- नागपूर हायवेच्या मिरज- वड्डी येथील बायपास रोडवर विटाने भरलेली ट्रॉली व बोलेरो यांच्यात समोरासमोर धडक होऊन ६ जण जागीच ठार झाले आहेत.

      प्राप्त झालेल्या माहितीनुसार, वड्डी जवळ विरोधी दिशेने चुकीच्या पद्धतीने वाहन चालवणाऱ्या  ट्रॉलील्या बोलेरो वाहनाची जोरकस समोरासमोर धडक झाल्याने बोलोरो मधील तीन पुरुष एक महिला व १३ वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला. तर चालकाचा ही मृत्यू झाला आहे. 

    आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. एकाच बोलेरोमध्ये सात जण असल्याची माहिती मिळत आहे. मृतांमध्ये एक महिला, बालकाचा समावेश आहे. यात चालक उमेश शर्मा (वय ३५, रा. शेळेवाडी, मूळ गाव बिहार ) सोहम पवार (वय १२), जयवंत पोवार (वय ४५), कोमल शिंदे (वय ६०), लखन शिंदे (वय ६०) (सर्व रा. सरवडे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) यांचा समावेश आहे.

       सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक बसवराज तेली व पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. अपघात इतका भीषण होता की सदरची घटना काळीज हेलावणारा होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा