Breaking

गुरुवार, १८ मे, २०२३

*श्री रवळनाथ को-ऑपरेटिव हाऊसिंग फायनान्स सोसायटीच्या वतीने गुणवान सभासदांचा केला सन्मान*


श्री रवळनाथ को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटीच्या वतीने सत्कार मूर्तींचा सन्मान होताना


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक* 


जयसिंगपूर : श्री रवळनाथ को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी, आजाराच्या जयसिंगपूर शाखेच्या  वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व नोकरीतून सेवानिवृत्त होणाऱ्या गुणवान सभासदांचा शाल, सन्मान चिन्ह व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शाखाध्यक्ष प्राचार्य डॉ.के.एस.पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष महावीर(अण्णा) चौगुले व प्रधान शाखेचे जनरल मॅनेजर मा.शिवानंद घुगरे व श्रीकांत चौगुले उपस्थित होते.

      सुरुवातीस शाखाध्यक्ष मा. प्राचार्य के.एस.पाटील यांनी उपस्थित मान्यवर घटकांचे स्वागत केले. प्रास्ताविकात ते म्हणाले, बँकेचे संस्थापक अध्यक्ष एल.एम. चौगुले यांच्या यांची उदात्त भावना, समाजोप्रति असलेले प्रेम, बँकिंग क्षेत्राच्या प्रगतीची महत्त्वकांक्षा आणि दूरदृष्टीतून आपल्या काही मोजक्या विश्वासू सहकाऱ्यांच्या माध्यमातून  छोट्याशा शहरातून सुरू झालेल्या श्री रवळनाथ को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटीच्या बँकिंग प्रवास हा देशाची राजधानी अर्थात दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. बँकेच्या स्थापनेपासून ते आजतागायात बँकिंग क्षेत्रातील सभासद ग्राहक हा राजा म्हणून त्याची सेवा सर्वतोपरी  करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या तसेच सेवानिवृत्त झालेल्या सभासदांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

      याप्रसंगी कन्या महाविद्यालय,मिरज येथील सेवानिवृत्त प्रा.सौ. सुजाता आवटी-पाटील यांचा सत्कार प्रा.सौ.खोलकुंबे यांचे हस्ते,जी.के.जी घोडावत कन्या महाविद्यालयाचे सेवानिवृत्त कार्यालयीन अधीक्षक श्री. राजकुमार देखणे यांचा सत्कार महावीर (अण्णा) चौगुले व केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाचे कोल्हापूर जिल्हा सचिव पदी निवड झाल्याबद्दल जयसिंगपूर कॉलेजचे प्रा.डॉ. प्रभाकर माने यांचा सत्कार जयसिंगपूर शाखेचे शाखाध्यक्ष प्राचार्य, डॉ.के.एस.पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

     सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्ती प्रा.सौ. सुजाता पाटील यांनी त्यांच्या घराच्या स्वप्नपूर्तीसाठी बँकेच्या माध्यमातून अत्यंत तातडीने केलेल्या आर्थिक सहकार्य याविषयी त्यांनी भाष्य केले. त्याचबरोबर संस्थेच्या वतीने कार्यशील सभासद,उत्तम शाखा सल्लागारासाठी संस्थेने सत्काररुपी कौतुक केल्या असल्याची माहिती ही त्यांनी याप्रसंगी त्यांनी दिली.श्री. राजकुमार देखणे यांनी संस्थेने सत्काराच्या माध्यमातून सेवानिवृत्तीनंतर ही काम करण्याची प्रेरणा दिली. सदर संस्था ही खऱ्या अर्थाने सभासदांसाठी स्थापन झालेले आहे हे त्यांच्या कार्यातून दिसून येते.

   प्रा.डॉ. प्रभाकर माने म्हणाले, एम.एल. चौगुले यांच्या अथक प्रयत्नातून संस्थेने आर्थिक विकास व प्रगतीची घोडदौड दिल्लीपर्यंत नेली. तसेच मल्टीस्टेट या शब्दाला अनुरूप होईल या पद्धतीने गोवा या राज्यांमध्ये नवीन शाखेची सुरुवात होणे हे या रवळनाथ को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटीच्या सर्वच घटकांच्या दृष्टीने भूषणावह व हितार्थ आहे. सदरची बँक ही आपल्या मुख्य कामाबरोबर सामाजिक संवेदनशीलता जपणारी जिल्ह्यातील एकमेव संस्था असल्याबाबत ही बोलले.सदरचा सत्कार म्हणजे एक प्रकारचे सभासदांच्यात नवचैतन्य निर्माण करणारी बाब आहे.

      या कार्यक्रमाचे प्रेरणादायी आभार प्रदर्शन शाखा सल्लागार प्रा.राजेंद्र आर.कोरे यांनी केले. तर या कार्यक्रमाचे उत्तम व सूत्रबद्ध रित्या सूत्रसंचालन शाखा सल्लागार प्रा.सौ.वंदना खोलकुंबे यांनी केले.

     या कार्यक्रमाचे उत्तम आयोजन जयसिंगपूर शाखा व्यवस्थापक श्री.किरण शहा व त्यांच्या टीमने केले. याप्रसंगी बँकेचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी व  अन्य घटक मोठ्या संख्येने उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा