Breaking

सोमवार, १ मे, २०२३

*मराठी अस्मितेचा बाणा व मराठी असल्याचा सार्थ अभिमान प्रत्येकाने बाळगला पाहिजे : प्रसिद्ध धन्वंतरी डॉ.सुभाष अडदंडे यांचे प्रतिपादन*


प्रसिद्ध धन्वंतरी डॉ.सुभाष अडदंडे 


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : आज दि.१ मे,२०२३ रोजी अनेकांत इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, जयसिंगपूर ज्यांच्या वतीने ‘महाराष्ट्र व कामगार दिन’ साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे संस्थेचे चेअरमन मा.डॉ. सुभाष अडदंडे व डॉ. महावीर अक्कोळे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

    कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन संस्थेचे चेअरमन मा.डॉ. सुभाष अडदंडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मा.डॉ. सुभाष अडदंडे यांनी 'जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा ! या पंक्तीने सुरुवात करून त्यांनी महाराष्ट्र व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 

     डॉ.अडदंडे मार्गदर्शन करताना म्हणाले, १ मे महाराष्ट्र दिन हा मराठी अस्मितेचा दिवस. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र आणि गुजरात राज्याची विभागणी करण्यात आली आणि स्वतंत्र महाराष्ट्र उदयास आले. महाराष्ट्र राज्याची निर्मिती होऊन तब्बल 63 वर्षे पूर्ण झाली. या महाराष्ट्राने सातत्याने विकासाची प्रक्रिया अखंडितपणे सुरू ठेवली. आज महाराष्ट्र राज्याची विकासाची परिपक्वता इतकी आहे की, देशातील कोणत्याही राज्यातील घटकांना ते सामावून घेऊ शकतात. त्यामुळे मराठी  अस्मितेचा बाणा व मराठी असल्याचा सार्थ अभिमान प्रत्येकाने बाळगला पाहिजे.

   सदरच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती मा.प्रा.आप्पासाहेब भगाटे, मा. श्री. बाळासाहेब इंगळे, मा.श्री. डॉ. धवल पाटील, मा.अ‍ॅड.आदिनाथ नरदे, मा. श्री. पी.सी. पाटील, जयसिंगपूर कॉलेजचे प्राचार्य डॉ.सुरत मांजरे, मा.श्री.विपीन खाडे, मा.श्री.अभिजीत अडदंडे, प्राथमिक विभागाच्या प्रमुख मा.सौ.भावना मुचंडीकर  माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या प्रमुख मा.सौ.प्रिया गारोळे व इतर शिक्षक व शिक्षकेतर, पालक वर्ग उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा