![]() |
प्रा.डॉ.अजितसिंह जाधव ,परीक्षा व मूल्यमापन संचालक, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षा मे महिन्याच्या शेवटच्या आठवडयात सुरू होणार असल्याची माहिती संचालक प्रा.डॉ. अजितसिंह जाधव यांनी दिली.
शिवाजी विद्यापीठाने दि. १७ एप्रिल २०२३ रोजी मार्च / एप्रिल २०२३ मधील उन्हाळी सत्रातील विद्यापीठांच्या परीक्षाचे प्रारंभ तारखांचे वेळापत्रक जाहीर केलेले आहे. सदर वेळापत्रक प्रसिद्ध झाल्यानंतर विद्यार्थी, पालक, प्राचार्य व शिक्षक संघटनांनी वेळापत्रकाबद्दल विद्यापीठाशी संपर्क साधून परीक्षा मे महिन्याच्या शेवटच्या आठवडयात सुरुवात करणेसंदर्भात विनंती केली होती. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि पुढील प्रवेश व नोकरीच्या संधी यांच्यापासून विद्यार्थी वंचित राहू नयेत यासाठी विद्यापीठ प्रशासनाने या परीक्षा अलीकडे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. नविन परीक्षा प्रारंभ तारखा विद्यापीठाव्दारे लवकरच जाहीर करण्यात येत असून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या परीक्षा अलीकडे होणार आहे हे गृहीत धरून परीक्षेच्या तयारीसाठी सुरवात करावी.
तसेच विद्यापीठाच्या तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्याना परीक्षा फॉर्म भरण्यास अडचणी येत असल्याचे दिसून आल्याने विद्यापीठाने परीक्षा फॉर्म भरण्यास दिनांक ०४/०५/२०२३ पर्यंत मुदतवाढ दिल्याचे परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ.अजितसिंह जाधव यांनी प्रेस पत्रकाद्वारे कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा