Breaking

मंगळवार, २ मे, २०२३

*मुलांच्या शारीरिक,मानसिक व बौध्दिक विकासासाठी शिबिराची गरज : मा.श्री.अशोक मादनाईक*


अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये उन्हाळी शिबिर


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर :  जयसिंगपूरस्थित अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या वतीने १ मे पासून उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.सदरचे शिबीर हे १ मे २०२३ पासून ते १० मे,२०२३ पर्यंत सुरू राहणार आहे. या शिबिरामध्ये क्रीडा, योगा, सूर्यनमस्कार ,झुम्बा डान्स,लाठी-काठी, लेझीम, हस्तकला, संगीत-गायन, अभिनय/नक्कल, कथाकथन, कविता, सामाजिक भाग व जादूचे प्रयोग तसेच या शिबिराचे खास आकर्षण म्हणजे २ मे रोजी टेलिस्कोप मधून शिबिरार्थीसाठी आकाश निरीक्षणाचा उपक्रम राबविला जाणार आहे.

   सदर उन्हाळी शिबिराचे उद्घाटन संस्थेचे सदस्य मा.अशोक मादनाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. शिबिर उद्घाटन प्रसंगी ते म्हणाले, मुलांच्या शारीरिक,मानसिक व बौध्दिक विकासासाठी अशा शिबिराची नितांत आवश्यकता असते. अशा शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास संधी मिळत असते.

     शिबिर स्थळी प्रात्यक्षिक लाठी-काठी व तलवारबाजी या मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक श्री. रवि आमणे, श्री. प्रतिक कुरडे, श्री. अमित माणगांवे व श्री. विजय हणबर यांनी सादरीकरण करून सर्वांचे लक्ष वेधीले. त्याचबरोबर ‘योगासनाचे प्रात्यक्षिक’ मा.सौ. अमृता पाटील व श्री. शुभम झेंडे सर यांनी दाखविले.

   सदर शिबिर आयोजनाबाबत पालक व शिबिरार्थी विद्यार्थी घटका कडून चांगला प्रतिसाद मिळाला. अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक नामी शिदोरी उपलब्ध करून दिली आहे. अशा प्रकारचा भरगच्च रचनात्मक उपक्रम राबविणे हे या शैक्षणिक संस्थेचे सामाजिक  बांधिलकी व उत्तरदायित्वाचे वैशिष्ट्य मानले जाते.

    सदरच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती मा.प्रा.आप्पासाहेब भगाटे, मा. श्री. बाळासाहेब इंगळे, मा.श्री. डॉ. धवल पाटील, मा.अ‍ॅड.आदिनाथ नरदे, मा. श्री. पी.सी. पाटील, जयसिंगपूर कॉलेजचे प्राचार्य डॉ.सुरत मांजरे, मा.श्री.विपीन खाडे, मा.श्री.अभिजीत अडदंडे, प्राथमिक विभागाच्या प्रमुख मा.सौ.भावना मुचंडीकर  माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या प्रमुख मा.सौ.प्रिया गारोळे व इतर शिक्षक व शिक्षकेतर, पालक वर्ग उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा