![]() |
यशस्वी गुणवंत विद्यार्थी |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : अनेकांत एज्युकेशन सोसायटी संचलित अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज जयसिंगपूरची विद्यार्थिनी कु.महेक हारूणबादशाह मुल्ला हिने कॉमर्स विभागात ९४.३३ टक्के गुण मिळवून शिरोळ तालुक्यात प्रथम आली आहे. तसेच कॉलेजचा एच.एस.सी बोर्डाचा वाणिज्य विभागाचा निकाल १०० टक्के लागला आहे.
कॉलेजच्या गुणवत्ता यादीत गुणानुक्रमे दुसऱ्या स्थानी कु. सिद्धी चंद्रगुप्त मगदूम ९१.६७ व कु. सानिका राजू लाटवडे ८५.८३ टक्के गुण मिळवून तृतीय स्थानी आहे.
कॉलेजच्या दैदीप्यमान सुयशात संस्थेचे चेअरमन डॉ. सुभाष अडदंडे, कॉलेजचे सीईओ प्रा.अभिजीत अडदंडे, सर्व संस्था पदाधिकारी व मुख्याध्यापिका सौ.प्रिया गारोळे व प्राध्यापक वृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा