*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : अनेकांत एज्युकेशन सोसायटी, बारामतीचे जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर चा १२ वी विज्ञान शाखेचा विद्यार्थी कु.अनमोल सुरेश पाटील हे विज्ञान शाखेत शिरोळ तालुक्यात प्रथम स्थानी विराजमान झाले आहेत.
कु. अनमोल सुरेश पाटील हा कॉलेजमधील अत्यंत हुशार व प्रामाणिक विद्यार्थी असून कॉलेजच्या प्रत्येक उपक्रमात सक्रीयपणे सहभागी होत असे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये प्राध्यापकानी स्कॉलर बॅचच्या माध्यमातून केलेलं उत्तम अध्यापन,वेळोवेळी घेतलेल्या विविध चाचणी परीक्षा व वैयक्तिक मार्गदर्शन यांच्या माध्यमातून अनमोल पाटील याची बारावी बोर्ड परीक्षेसाठी उत्तम तयारी करवून घेतली होती. याच पार्श्वभूमीवर अनमोल पाटील हा विज्ञान शाखेत शिरोळ तालुक्यात प्रथम आला.
अनमोल पाटील याची शैक्षणिक पार्श्वभूमी अशी 10 वी बोर्ड परीक्षेत 99.60 टक्के गुण मिळवून निकालात शिर्षस्थानी होता. अनमोल ची आई सौ.अनिता सुरेश पाटील यांचे शिक्षण - B.A. असून त्या गृहिणी आहेत. मुलाचे वडील श्री.सुरेश शामगोंडा पाटील यांचे शिक्षण - B.A..असून ते व्यवसायाने ब्रोकरचे काम करतात. तर त्यांचे लहान भाऊ श्री. अविनाश सुरेश पाटील याचे शिक्षण MCA असून Bootnext Tech Ventures (Software Company) या ठिकाणी ते As Software Engineer म्हणून कार्यरत आहेत.
अनमोलचे व्यक्तिमत्व अष्टपैलू असल्याने तो सर्व क्षेत्रात आघाडीवर असतो. त्याच्या या यशाने जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर चे नाव उज्वल झाले असून त्याच्या या यशस्वी सुयशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
संस्थेचे चेअरमन डॉ.सुभाष अडदंडे, सचिव डॉ.महावीर अक्कोळे, खजिनदार मा.पद्माकर पाटील, संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य, त्याचबरोबर कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरत मांजरे, उपप्राचार्य प्रा.भारत. आलदर, पर्यवेक्षक प्रा.डॉ. महावीर बुरसे, संगणक शास्त्र प्रमुख प्रा. बी.ए.पाटील व सर्व प्राध्यापक वृंद यांचे मोलाचं सहकार्य लाभल्यामुळे हे यश शक्य झाले असल्याचे अनमोल पाटील यांनी सांगितले. संस्थेच्या व कॉलेजच्या सर्व घटकांकडून त्याचे अभिनंदन करण्यात आले.
जय हिंद न्यूज नेटवर्कशी बोलताना ते म्हणाले, मला पुढे जाऊन सॉफ्टवेअर इंजिनिअर बनायचं आहे. कॉलेजच्या माध्यमातून कौशल्य व ज्ञानरूपी शिदोरी मिळाली आहे. त्याचबरोबर प्राध्यापकानी वैयक्तिक मार्गदर्शन करून माझा आत्मविश्वास दृढ केला होता. तसेच आई-वडिलांचे मार्गदर्शन व शुभशीर्वाद यामुळे हे यश मिळवता आले. माझ्या यशाचे अध्ययनातील मुख्य गमक म्हणजे उत्तम नियोजन, अभ्यासातील सातत्य, वेळोवेळी घेतल्या जाणाऱ्या चाचण्या व गुरुजींनी केलेला मार्गदर्शन यामुळे हे शक्य झाले.
अनमोल पाटील यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा