Breaking

रविवार, २८ मे, २०२३

*एच.एस.सी. बोर्ड ,मार्च २०२३ च्या परीक्षेत जयसिंगपूर कॉलेजचे उज्वल यश*


जयसिंगपूर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे बारावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश

*प्रा.डॉ.महावीर बुरसे : उपसंपादक*


जयसिंगपूर : अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर येथील  एच.एस.सी. बोर्ड  फेब्रुवारी/ मार्च 2023 कॉलेजचा निकाल 90.30%, सायन्स विभागाचा 95% कॉमर्स विभागाचा 93.44% तर आर्ट्स विभागाचा 73.07% लागला आहे. सायन्स विभागातील कॉम्प्युटर सायन्सचा विद्यार्थी कु.अनमोल सुरेश पाटील 92.50% गुण मिळवून शिरोळ तालुक्यात सर्वप्रथम येण्याचा मान पटकाविला असून महाविद्यालयाच्या दृष्टीने अभिमानास्पद गोष्ट आहे.

      अनमोल पाटील या विद्यार्थ्यास इंग्रजी विषयात 92, फिजिक्स विषयात 91, केमिस्ट्री 89, मॅथ्स 89 व कम्प्युटर सायन्स 97 गुण प्राप्त झाले आहेत. द्वितीय क्रमांक ऋतुजा विजय कदम 89.30% व प्रणव पोपट पाटील यांनी 88.80% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे.

        कॉमर्स विभागामध्ये प्रथम क्रमांक क्षितिजा दिलीप चव्हाण 81.50%, द्वितीय क्रमांक विभागून अमृता सुदर्शन हिरूकडे व प्रणव किरण कांबळे 80.67% व  पार्थ महावीर कनवाडे 77.67 %  या व विद्यार्थ्यांने तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.

      आर्ट्स विभागात प्रथम क्रमांक कु.प्राची दयानंद आंबी  73.67%, द्वितीय क्रमांक कु.मयुरी अरुण देसाई 68.50% व तृतीय क्रमांक अपूर्वा सुरेश पवार 64.66% गुण मिळवून यशाची उज्वल परंपरा कायम राखलेली आहे. 


    या विद्यार्थ्यांच्या यशामध्ये स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे सचिव डॉ.महावीर अक्कोळे, खजिनदार श्री पद्माकर पाटील तथा सर्व संस्था पदाधिकारी व प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थ्यांच्या यशाचे सर्व स्तरातून कौतुक असून कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य श्री बी.ए. आलदर, पर्यवेक्षक डॉ.एम.जे.बुरसे,  संगणक विभाग प्रमुख श्री बी.ए पाटील व सर्व शिक्षक प्र.शासकीय कर्मचारी यांचे अनमोल असे सहकार्य लाभले. 

    महाविद्यालयामध्ये आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, कॉम्प्युटर व इलेक्ट्रॉनिक्स तथा सायन्स विभागासाठी MHT-CET चे प्रवेश सुरू आहेत. तरी विद्यार्थ्यांनी आजच प्रवेश निश्चित करावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा