![]() |
स्कॉलरशिप परीक्षेत अनेकांतच्या विद्यार्थ्यांनी मिळवलं सुयश |
*ऋतुजा शिंदे : विशेष प्रतिनिधी*
जयसिंगपूर : अनेकांत इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्यु. कॉलेज, जयसिंगपूर मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे तर्फे घेण्यात येणा-या पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता – 5 वी सन 2022-23 मध्ये 18 विद्यार्थी परीक्षेमध्ये उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले. तसेच इयत्ता 8 वी मध्ये सदरच्या परीक्षेत 10 मुले उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले.
सदरच्या परीक्षेसाठी मा. सौ. भावना मुचंडीकर मॅडम, सौ. स्वाती शिंदे मॅडम, सौ. जास्मिन काझी मॅडम, सौ.अक्कोळे मॅडम, सौ. संगीता दरभे मॅडम, कु. दिपाली माणगांवे मॅडम, सौ. रेश्मा देसाई मॅडम या शिक्षकांचे उत्तम मार्गदर्शन लाभले. संस्थेचे पदाधिकारी व इतर संचालकांचे सहकार्य लाभले.
शाळेच्या व संस्थेच्या वतीने सदर परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या स्कॉलरशिप परीक्षेतील सुयशाबद्दल पालक वर्गाकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा