![]() |
मयत अमीर नदाफ, हेरवाड |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील हेरवाडच्या युवकाचा संशयास्पद मृत्यू झाल्या असल्याची तक्रारीनंतर दफन केलेल्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आले.
अधिकृत सूत्राकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, हेरवाड येथील मयत व्यक्ती आमिर बालेचंद नदाफ वय वर्ष ३० या युवकाचा सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील कोगनोळी येथे संशयास्पद मृत्यू झाल्याची तक्रार आमिरची पत्नी फातिमा अमीर नदाफ आणि अकबर बालेचंद नदाफ यांनी कवठेमंहाकाळ पोलिसात दिली.
त्यानंतर पोलीस बंदोबस्तात आज दि.२ मे,२०२३ रोजी कबर खुदाई करून आमिरचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेहाचे शव विच्छेदन करण्यासाठी आज दुपारी ४.०० वाजता कवठेमंहाकाळचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर गोरे, अब्दुल्लाटच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकासह हेरवाड येथील कब्रस्तानामध्ये दाखल झाले.
दरम्यान शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच मृत्यु की घातपात हे स्पष्ट होणार आहे. अमीर नदाफ याची सहा महिन्यापूर्वी पत्नी फातिमा नदाफ हिच्याशी वाद झाल्यानंतर ती माहेरी इचलकरंजीला निघून गेली होती. याच घरगुती तणावातून आमिर नदाफ हा कोगनोळी येथील आपल्या आत्याकडे ६ महिन्यापासून राहत होता. शनिवारी रात्री अमीर नदाफ याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती आते भाऊ सलीम दाऊद नदाफ राहणार कोगनोळी यांनी दिली. शनिवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास आमिर नदाफ याचा मृतदेह हेरवाड या मूळ गावी आणण्यात आला. रविवारी सकाळी मृतदेहाचं दफनविधी करण्यात आला. दरम्यान अमीर नदाफ व सलीम नदाफ यांच्यामध्ये शनिवारी सायंकाळी कोणत्यातरी कारणावरून वादावादी झाली होती. त्यानेच मारहाण केल्याने आमिरचा मृत्यू झाला असावा असा संशय व्यक्त करत भाऊ अकबर नदाफ आणि पत्नी फातिमा नदाफ यांनी अमितचा मृत्यू संशयास्पद आहे याबाबत ची तक्रार सलीम नदाफ यांच्याविरोधात दिली होती.
त्या तक्रारीच्या अनुषंगाने कवठेमंहाकाळचे सहायक पोलीस निरीक्षक सागर गोरे यांनी कुरुंदवाड चे पोलीस निरीक्षक बालाजी भांगे यांच्याशी संपर्क साधला. तसेच हेरवाड येथे दफन केलेला आमिरचा मृतदेह पुन्हा खुदाई करून काढून शव विच्छेदन करण्यासाठी पत्र दिले. त्यानंतर अब्दुललाट आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व त्यांचे पथक हेरवाड येथील कब्रस्तानामध्ये दाखल झाले. खुदाई करून मृतदेह बाहेर काढून मृतदेहाचं शव विच्छेदन केले.
या घटनेमुळे हेरवाड गावात तणावपूर्ण वातावरण बनले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा