![]() |
अनेकांत इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, जयसिंगपूर |
*प्रा.डॉ.भोलू शर्मा : विशेष प्रतिनिधी*
जयसिंगपूर : आज दि.02/05/2023 रोजी अनेकांत इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, जयसिंगपूर येथे उन्हाळी शिबिर सुरू असून शिबीराचे औचित्य साधून शिबिरार्थीसाठी अवकाश दर्शन हा उपक्रम राबविण्यात आला.निरभ्र अवकाशात ग्रह - ता-यांचे दर्शन घडवून आणले. यामुळे बालचमुंच्या मनात आनंदाचे टिपूर चांदणे पडले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा.प्रा. आप्पासाहेब भगाटे यांनी भूषविले. यावेळी मा.डॉ.महावीर अक्कोळे मा. महावीर पाटील उपस्थित होते.
जयसिंगपूर कॉलेजचे प्रा.डॉ. प्रशांत चिक्कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील अवकाश संशोधनाचा अभ्यास करणारे नागेश कोठावळे, अक्षय माने, प्रितम इंगळे, सम्यक संबोधी या विद्यार्थ्यांनी प्रोजेक्टर वरती आकाशगंगेचे संपूर्ण ज्ञान विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना अत्यंत सोप्या भाषेत करून दिले. त्यानंतर शिवाजी विद्यापीठातून आणलेला Sky Line Telescope (स्काय लाइन टेलिस्कोप) द्वारे व इतर दुर्बिण व लेसरद्वारे सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना आकाशगंगेतील ग्रहांचे जवळून दर्शन घडवून आणले.
याप्रसंगी मा.वाडकर सर, मा.श्री. सुतार सर, स्कूलचे सी.ई.ओ. मा.प्रा.अभिजीत अडदंडे , मुख्याध्यापिका सौ. प्रिया गारोळे व सौ. भावना मुचंडीकर मॅडम उपस्थित होते.
यावेळी कल्याणी अक्कोळे मॅडम, यश चिक्कोडे व जयश पाटील यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. संध्याकाळी 6 ते 10 यावेळी जयसिंगपूर कॉलेज क्रिडांगणावर मुलांनी प्रकाशलेले अवकाश मनमुरादपणे अनुभवले. यावेळी शाळेमार्फत विद्यार्थी व पालक यांना अल्पोपहार देण्यात आला. यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा