Breaking

शुक्रवार, ५ मे, २०२३

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या 'महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुखपदी' अर्जुन गोडगे


संपादक ,अर्जुन गोडगे यांना निवडीचे पत्र प्रदान करताना ज्येष्ठ व प्रसिद्ध पत्रकार राजा माने




*प्रा.डॉ. प्रभाकर माने :  मुख्य संपादक*

कोल्हापूर : चालू काळ हा डिजिटल मीडियाचा काळ म्हणून ओळखला जातो, डिजिटल मीडियामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांच्या हक्कासाठी कल्याणसाठी ज्येष्ठ संपादक, माध्यमतज्ञ राजा माने यांनी 'डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटने'ची स्थापना २०२१ मध्ये केली. या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने हे असून डिजिटल मीडियाच्या पत्रकारासाठी काम करणारी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी संघटना म्हणून गणली जाते. या संघटनेच्या 'महाराष्ट्र राज्य प्रसिद्ध प्रमुख पदी' अर्जुन (नाना) रामहरी गोडगे यांची नुकतीच निवड करण्यात आली.

        डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे पहिले अधिवेशन महाबळेश्वर भिल्लार येथे संपन्न झाले होते. या अधिवेशनाला महाराष्ट्रातून दीड हजार हून अधिक पत्रकारांनी सहभाग नोंदवला होता. या अधिवेशनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डिजिटल माध्यमातून अर्धा तास संवाद साधला. अधिवेशनाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई व शिक्षणमंत्री दीपक केसरकर व खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासह जास्त आजी-माजी आमदारांनी सहभाग नोंदवला. अशा राज्य संघटनेच्या प्रसिद्धी प्रमुख पदी गोडगे यांची निवड करण्यात आली आहे.

    या निवडीचे पत्र डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या हस्ते अर्जुन गोडगे यांना देण्यात आले. यावेळी कोषाध्यक्ष मुरलीधर चव्हाण, सह कोषाध्यक्ष गणेश शिंदे, खामक्या धडकचे संपादक अमित इंगोले, राज्य कार्यकारिणी सदस्य सूर्यकांत वायकर, ज्येष्ठ पत्रकार सचिन अपसिंगकर, शशांक शिंगाडे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा