Breaking

रविवार, ७ मे, २०२३

*शिवाजी विद्यापीठाच्या मार्च / एप्रिल, २०२३ मधील होणा-या ( उन्हाळी सत्रातील) सुधारित परीक्षेला २५ मे पासून प्रारंभ : संचालक प्रा.डॉ.अजितसिंह जाधव*


संचालक,प्रा.डॉ.अजितसिंह जाधव, परीक्षा विभाग व मूल्यमापन मंडळ


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या मार्च / एप्रिल, २०२३ मधील होणा-या ( उन्हाळी सत्रातील) सुधारित परीक्षेला  २५ मे पासून प्रारंभ होत आहेत.

       शिवाजी विद्यापीठाच्या मार्च / एप्रिल २०२३ मध्ये आयोजित करावयाच्या परीक्षांच्या प्रारंभ तारखा परिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आल्या होत्या. तथापि, पुढील शैक्षणिक वर्ष सुरळीतपणे सुरू होण्याच्या दृष्टीने विद्यापीठामार्फत आयोजित करण्यात येत असलेल्या परीक्षांच्या प्रारंभ तारखेमध्ये बदल करण्यात आला आहे. सदरच्या परीक्षा या २५ मे,२०२३ पासून सुरू होत आहे. सुरुवातीलाच बी. ए.भाग -३ सेमीस्टर ५ व ६  आणि बी. कॉम.भाग -३ सेमीस्टर ५ व ६ ला प्रारंभ होत आहे.

    सदरचे परिपत्रक शिवाजी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच महाविद्यालयीन पातळीवर सर्व संबंधीत विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांच्या निदर्शनास आणावे. तसेच परिपत्रकामध्ये उल्लेखित परीक्षा तारखा व अन्य तपशिलाप्रमाणे सर्व अनुषंगिक बाबीची पूर्तता करुन विद्यापीठाच्या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन शिवाजी विद्यापीठ परीक्षा विभाग व मूल्यमापन मंडळचे संचालक, प्रा.डॉ. अजितसिंह जाधव यांनी परिपत्रकाद्वारे माहिती दिली आहे.


        *अत्यंत महत्वाचे*

. मार्च / एप्रिल २०२३ उन्हाळी सत्रातील पदवी स्तरावरील पारंपारिक अभ्यासकमाच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या परीक्षेबाबत यथावकाश कळविण्यात येत आहे. 

२. स्वयम परिक्षा, भारतीय कम्पनी सचिव संस्थान यांचे मार्फत आयोजित Company Secretaries (CS) ची परीक्षा तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने अभियांत्रिकी, आर्किटेक्चर व औषधनिर्माण शास्त्र व इतर अभ्यासकमाची 'एमएचटी-सीईटी सामाईक प्रवेश परीक्षा असेल त्या दिवशी संगणकाशी संबंधीत परीक्षा तसेच शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचे जा. क. आस्थापना / २४५५, दि. १६ डिसेंबर, २०२२ रोजीच्या परिपत्रकातील सार्वजनिक सुट्टया दिवशी विद्यापीठाच्या कोणत्याही लेखी / प्रात्यक्षिक परीक्षा त्या तारखेस घेण्यात येवू नयेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा