Breaking

शुक्रवार, ५ मे, २०२३

*कोल्हापूरच्या उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालकपदी प्रा.डॉ. हेमंत कटरे यांची नियुक्ती ; डॉ. राजेसाहेब मारडकर यांची बदली*


प्रा.डॉ. हेमंत कठरे,सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग, कोल्हापूर


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


कोल्हापूर : उच्च शिक्षण विभाग कोल्हापूरच्या शिक्षण सहसंचालक पदी प्रा.डॉ. हेमंत कठरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तर डॉ. राजेसाहेब मारडकर यांची नागपूरला स्वगृही बदली करण्यात आली आहे. 

     कोल्हापूर जिल्ह्यातील काही महाविद्यालयात मार्च-एप्रिल २०२३ मध्ये सहाय्यक प्राध्यापकांची भरती प्रक्रिया झाली. या भरती प्रक्रियेदरम्यान वेगवेगळ्या टप्प्यावर आर्थिक उलाढाली झाल्याच्या तक्रारी झाल्या. या साऱ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या कमिटीने अहवाल सादर केला आहे. त्यामध्ये प्राध्यापक निवड प्रक्रियेवर योग्य पर्यवेक्षकीय नियंत्रण नसल्याचा आक्षेप उच्च शिक्षणाचे कोल्हापूर विभागीय सहसंचालक डॉ. राजेसाहेब मारडकर यांच्यासंबंधी नोंदविण्यात आला आहे. त्या अनुषंगाने उच्च व तंत्रशिक्षण विभागाने कोल्हापूर विभागीय शिक्षण सहसंचालक मारडकर यांना त्यांच्या मूळ विभागात म्हणजे वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था, नागपूर येथे सहयोगी प्राध्यापक या पदावर परत पाठविण्यात आले. त्यामुळे रिक्त झालेल्या कोल्हापूर विभागीय शिक्षण सहसंचालक या पदाचा अतिरिक्त कार्यभार येथील राजाराम कॉलेजमधील प्रा. डॉ. हेमंत कठरे यांच्याकडे दिला आहे.राज्य सरकारच्या उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव प्रताप लुबाळ यांनी ४ मे,२०२३ रोजी यासंबंधीचा आदेश काढला आहे.

    प्रा.डॉ.हेमंत कठरे हे सध्या राजाराम शासकीय महाविद्यालय, कोल्हापूर येथे प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. अर्थशास्त्र विषयाच्या अध्ययन व अध्यापनाच्या माध्यमातून त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली  असून संशोधन क्षेत्राच्या कार्यात ते आघाडीवर असतात. शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र अभ्यास मंडळावर विद्यमान सदस्य आहेत.अर्थशास्त्र विषयातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व, शैक्षणिक व सामाजिक चळवळीतील एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून ती परिचयाचे आहेत. मराठी अर्थशास्त्र परिषद व शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स असोसिएशन अर्थात सुयेकचे सदस्य आहेत. विविध ठिकाणी व्याख्याते व साधन व्यक्ती म्हणून उच्च कोटीची कामगिरी आहे. डॉ.कठरे यांच्या कार्याची दखल घेत अनेक पुरस्काराने ते सन्मानित झाले आहेत. खऱ्या अर्थाने ते अर्थशास्त्र विषयातील एक परिपूर्ण अर्थतज्ज्ञ तसेच कुशल प्रशासक म्हणून सर्वांना ज्ञात आहेत.या अगोदर त्यांनी उच्च शिक्षण विभाग कोल्हापूर या ठिकाणी सहसंचालक म्हणून उत्तम कामगिरी करून आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची छटा दर्शविली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा