![]() |
महात्मा गांधीजींचे नातू अरुण गांधी यांचे दुःखद निधन |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कोल्हापूर : महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे कोल्हापुरात निधन झाले आहे. वयाच्या ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. लेखक आणि महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे कोल्हापुरात निधन झाले आहे. वयाच्या ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
सामाजिक-राजकीय कार्यकर्ते असलेले अरुण गांधी यांच्या पार्थिवावर आज कोल्हापुरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, असे त्यांचे पुत्र महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. तुषार गांधी हे कोल्हापूरकडे रवाना झाले आहेत. अरुण गांधी यांचे गेल्या दोन महिन्यांपासून कोल्हापुरात वास्तव्य होते. अरुण गांधी हे मणिलाल गांधी यांचे पुत्र आहेत. १४ एप्रिल १९३४ रोजी डर्बनमध्ये त्यांचा जन्म झाला होता. ते त्यांचे आजोबा महात्मा गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवत सामाजिक कार्यात सक्रिय होते.
त्यांच्या पश्चात मुलगा तुषार गांधी,मुलगी अर्चना गांधी, नातू व परतुंडे आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा