Breaking

शुक्रवार, १९ मे, २०२३

*जयसिंगपूर येथे रविवारी प्रसिद्ध धन्वंतरी व लेखक डॉ. महावीर अक्कोळे, डॉ.सागर बोराडे,सौ. सुनेत्रा नकाते व स्व. सुमेरचंद जैन या प्रसिद्ध लेखकांचे पुस्तक प्रकाशन सोहळा*



*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


 जयसिंगपूर : येथे रविवार दिनांक २१ मे,२०२३ रोजी चार पुस्तकांचा प्रकाशन समारंभ आयोजित केला आहे. प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार व प्रख्यात लेखिका डॉ. तारा भवाळकर यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन समारंभ होत आहे अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या जयसिंगपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. महावीर अक्कोळे यांनी दिली. 

    संतांचा तो संग नव्हे भलतैसा - डॉ. महावीर अक्कोळे, जैन कथेनंतरची कथा - सौ. सुनेत्रा नकाते, तीर्थंकर भ. महावीर वर्धमान - प्रा. डॉ. बाबा बोराडे आणि आचार्यश्री आर्यनंदी जीवनगाथा - स्व. सुमेरचंद जैन यांची ही चार पुस्तके मानवरांच्या हस्ते प्रकाशित होत आहेत.

    हा कार्यक्रम जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूरच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये रविवारी (दि.२१) सायंकाळी ४.०० वाजता आयोजित केला आहे. तरी साहित्य प्रेमीं व इतर घटकांनी या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन डॉ. महावीर अक्कोळे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा