![]() |
नृसिंहवाडी येथे कृष्णा नदी पात्रात एकाचा बुडून मृत्यू |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
शिरोळ : नृसिंहवाडी येथे कृष्ण नदीत फुलचंद सरदार गुर्जर याचा बुडून मृत्य तर तिघांना जीवदान देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
अधिकृत सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी येथे एका परप्रांतीय युवकाचा कृष्णा नदी पात्रात बुडून मृत्यू झाला असून अन्य तिघा जणांना वाचवण्यात स्थानिक लोकांना यश आले आहे. मूळचे राजस्थानचे असणारे फुलचंद सरदार गुर्जर, सुरेंद्र डंका, सुरेंद्र गुर्जर व सुभाष चौधरी, फुलचंद चौधरी हे पाचजण फरशी कामानिमित्त नृसिंहवाडी येथे आले होते. दुपारी तीनच्या सुमारास यापैकी चौघेजण कृष्णा नदीत अंघोळीसाठी उतरले होते. पोहता येत नसल्याने घाटाच्या पायऱ्यावर बसून स्नान करत होते. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने हे चौघे बुडू लागले. मोठ्याने आरडाओरडा ऐकताच स्थानिक नागरिकांनी धाव घेतली. यावेळी तिघांना वाचवण्यात यश आले.मात्र मयत फुलचंद सरदार गुर्जर खोल पाण्यात गेल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. काही वेळानंतर त्या ठिकाणी असणारे नावाडी भूषण गावडे व अजित कलगी या दोघांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला.
या घटनेची माहिती शिरोळ पोलीस ठाण्यास मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शिरोळ ग्रामीण रुग्णालयास पाठवण्यात आला. अधिक तपास शिरोळ पोलीस करीत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा